दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद, 8 लाखांच्या 12 गाड्या जप्त

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांच्या मुसक्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या आहेत. चोरट्यांकडून ७ लाख ८५ हजार रुपये किंमतीच्या १२ दुचाकी आणि तीन चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी केली.

प्रविण चंद्रकांत भंडारे (वय-२० रा. संग्रामनगर झोपडपट्टी, निगडी), अमोल उर्फ बाळा अनंत जाधव (वय-१९ रा. साने कॉलनी, चिखली),सागर उर्फ लाला चंद्रकांत गगलानी (वय-२९ रा. ओम साई राम बिल्डींग, साईचौक, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी शनिवारी (दि.३) शहरात गस्त घालत असताना पोलीस नाईक निशांत काळे यांना अंकुश चौकाच्या कमानीजवळ भंडारे उभा राहीला असून तो वाहन चोरी करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून भंडारे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने साथीदार अमोल जाधव याच्या मदतीने दुचाकी आणि रिक्षा चोरल्याची कबुली दिली. या दोघांकडून ५ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या दोन रिक्षा आणि चार दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या.

खंडणी विरोधी पथकाने सोमवारी (दि.५) डेअरी फार्म रोडवर सापळा रचून सागर गगलानी याला ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या दुचाकी विषयी चौकशी केली असता दुचाकी चोरी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या. आरोपींनी चिखली, निगडी आणि पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी आणि रिक्षा चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बडे, अनिकेत हिवरकर, पुरुषोत्तम चाटे, पोलीस हवालदार गणेश हजारे, अजय भोसले, अशोक दुधावणे, महेश खांडे, पोलीस नाईक निशांत काळे, शैलेश सुर्वे, उमेश पुलगम, किरण काटकर, आशिष बोटके, नितीन लोखंडे, शरीफ मुलाणी, प्रवीण कांबळे, विक्रांत गायकवाड, सागर शेडगे, गणेश कोकणे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like