अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकन डॉलर देण्याच्या आमिषाने लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला फरासखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. बबलू हरेश शेख (वय ४५, रा. मदनडेरी, दिल्ली), सेतू आबू मतूबूर (वय २०, खैरे थाना, गुवाहटी), सिंतू मुतालिक शेख (वय ३६, अजमेर, राजस्थान), रिदोई महंमद रहिम खान (वय १९, नवी दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आशिष चव्हाण (वय ३९, रा. आंबेगाव बु.) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.

अशी केली फसवणूक

फिर्यादी यांचे बुधवार पेठेत चप्पल बुट विक्रीचे दुकान आहे. त्या दुकानात असताना बबलू शेख हा त्यांच्या दुकानात आला. त्याने एक साडेसातशे रुपयांचा शुज खरेदी केला. त्यानंतर त्याने एक अमेरिकन २० डॉलरची नोट चव्हाण यांना दिली. चव्हाण यांना दाखवून एका डॉलरची किंमत ७० रुपये आहे. तुम्हाला तो ३० रुपयांना देतो. असे म्हणून त्याने एक नोट दिली आणि त्यानंतर तुमच्याकडे चालतो का बघा. खात्री झाल्यावर सांगा म्हणत ते फोन नंबर देऊन निघून गेले. चव्हाण यांनी मित्रांकडेच डॉलर खरा आहे की, खोटा याची खात्री केली. त्यानंतर त्यांना ६ जून रोजी फोन करून डॉलर पाहण्यास बोलवून तेथे कॅनॉलकडे नेले, तेथे खरे डॉलर दाखवले. त्यानंतर दीड लाख रुपयात ५०० डॉलर देण्याचे ठरले. दरम्यान ८ जून रोजी त्यांना पुन्हा बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजजवळ बोलवून तेथे त्यांच्याकडील अमेरिकन डॉलर ठेवलेली कॅरिबॅग दिली. त्यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले आणि त्यानंतर ते निघून गेले. पुढे चव्हाण यांनी २० डॉलरची नोट व कागदी गुंडाळी आढळून आली. दरम्यान फसवणूक झाल्यावर चव्हाण यांनी फरासखाना पोलिसांत धाव घेतली.

अशा ठोकल्या टोळीला बेड्या

याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी लागलीच तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी याप्रकरणाचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यावेळी फिर्यादी चव्हाण यांनी आरोपींना ओळखले. त्यावेळी त्यांचा माग काढल्यावर त्यावेळी ते जनता वसाहत येथे येणार असल्याची माहिती पोलीस नाईक दिनेश भांदुर्गे यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्यांना दांडेकर पुलाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून त्यांना अटक केली. तर त्यांची साथीदार महिला झांगी व कबीर ईस्माईल शेख हे पळून गेले. त्यांची झडती घेतल्यावर बबलू शेखकडे डॉलरचे एक बंडल मिळून आले. ते पोलिसांनी जप्त केले.

शहरात अनेकांना घातला गंडा

पुण्यातील खडकी, शिवाजीनगर, हडपसर, चंगननगर परिसरातही त्यांनी फसवणूक केल्याचे कबूल केले. दरम्यान हे सर्वजण दिल्ली, उत्तरप्रदेश, आसाम, राजस्थानचे राहणारे आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मंगेश शिंदे, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, सहायक पोलीस निरीक्षक यशपाल सुर्यवंशी, कर्मचारी बापू खुटवड, केदार आढाव, दिनेश भांदुर्गे, सुरेंद्र जगदाळे, सयाजी चव्हाण, विशाल चौगूले, पंकज देशमुख, राजू देवकर, विकास बोऱ्हाडे, शंकर कुंभार, महावीर वलटे, मोहन दळवी, आकाश वाल्मिकी, अमेय रसाळ, मयूर भोकरे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

 

 

 

Loading...
You might also like