रेल्वेमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर रेल्वेतील महिलांच्या डब्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दरोड्यात वापरण्यात येणारी हत्यारे जप्त केली आहेत.
शंकर भीमराव जगले (वय २०), यशवंत बाळू वाघमारे (वय-२०), अशोक संतोष आडवानी (वय-२१ तिघे रा. पिंपरी), समाधान कांताराम वणवे (वय-२१ अहमदनगर), श्रीनिवास अशोक अलकुंटे (वय-३६ रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्या दोन अल्पवयीन साथिदारांना ताब्यात घेण्यात आले.

तळेगाव रेल्वे स्थानकावर १२ ते १४ जण थांबले असून ते रेल्वेमध्ये दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड यांना मिळाली. पोलिसांनी पथक तयार करुन तळेगाव रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून आरोपींना अटक केली. टोळीकडून रात्री उशीरा तीनच्या दरम्यान मुंबई विजापूर फास्ट पॅसेंजर रेल्वेतील महिलांच्या डब्यात दरोडा टाकणार होते. मात्र, दरोडा टाकण्यापूर्वीच पोलिसांनी सात जणांना अटक केली. तर त्यांचे इतर सात आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आरोपींकडून दोन चाकू, तीन ब्लेड व दोन मिर्ची पावडरचे पॅकेट जप्त केले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार पाटिल यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (पुणे रेलवे पुलिस) चे पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, पोलीस कर्मचारी भोसले, बनसोडे, धनंजय दुगाने, अनिल दांगट, जगदीश सावंत, सुनील कदम,  दिनेश बोरनारे, विक्रम मधे, स्वप्नील कुंजीर, अतुल कांबळे, नीलकंठ नांगरे, काशिनाथ पुजारी, दिंगबर मोरे यांच्या पथकाने केली.