‘त्याचा’ खेळ ‘खल्लास’ करण्यासाठी गेलेलं 11 जणांचं टोळकं पुणे पोलिसांच्या ‘जाळ्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून मोक्का गुन्ह्यातील आरोपीचा गेम करण्यासाठी गेलेल्या टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत पसरवली होती. हा प्रकार मंगळावारी रात्री नऊच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील तुकाईनगर आणि समर्थ नगरमध्ये घडला होता. या घटनेतील आरोपींना सिंहगड रोड पोलिसांनी काही तासात हडपसर परिसरातून अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले.

सुंदर रामचंद्र शर्मा (वय १९), विक्रम प्रमोद पवार (वय १९), लक्ष्मीकांत रमेश देसाई (वय १९), साहिल उर्फ परवेज हैदरअली इनामदार (वय १८), सुमित राजकुमार सुरवसे (वय २०), प्रसाद सोपान बांदल (वय २३), अनिकेत राजु वायदंडे (वय १९), प्रफुल्ल भारत कांबळे (वय १९), अक्षय युवराज ठाकरे (वय २४ ), ऋतिक सुदाम इंगोले (वय १९ ), सनी उर्फ गिरीष महेंद्र हिवाळे (वय २० सर्व रा. काळे पडळ, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या अकरा आरोपींची नावे असून दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. आरोपींनी तुकाई नगर आणि समर्थ नगर परिसरात २० ते २५ वाहनांच्या काचा फोडुन कोयत्याने व तलवारीने मोडतोड करून परिसरात दहशत माजवून मोठे नुकसान केले. तसेच घरात घसून घरातील सामानाची तोडफोड केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगार बंटी पवार सुटल्यानंतर १९ ऑगस्ट रोजी बंटी पवार याच्या साथीदारांनी त्याच्या सांगण्यावरून चेतन ढबे याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, अशी तक्रार चेतन ढबे आणि राहुल वायबसे यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे केली होती. याच हल्ल्याचा राग मनात धरून चेतन ढबे याने हडपसरमधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांशी संपर्क साधून बंटी पवारचा गेम करण्याचा कट रचला होता. मात्र, बंटी पवार चौकशीसाठी पोलीस ठाण्यात असल्यामुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. त्यामुळे चिडलेल्या टोळक्याने या परिसरातील वाहनांची तोडफोड केली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like