किरकोळ कारणावरून टोळक्याची घरात घूसून मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – टेम्पो लावण्याच्या वादातून नऊ जणांच्या टोळक्याने घरात घूसून पती पत्नी व मुलांना मारहाण करत राडा घातल्याचा प्रकार हडपसर येथील रामोशी आळी येथे घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.

संतोष पोपट चव्हाण (३७), मोहन पोपट चव्हाण (४१), मधुकर पोपट चव्हाण (३४), रौनक राजेंद्र शिंदे (२८, रा. रामोशी आळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी नितीन रतन ससाणे (४५,) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व हल्ला करणारे एकाच परिसरात राहण्यास आहेत. त्यांचे टेम्पो लावण्यावरून वाद झाले होते. त्या वादाचा राग आल्याने नऊ जणांनी फिर्यादी यांच्या घरात घूसून त्यांना लाकडी दांडके व हॉकी स्टिकने मारहाण केली. त्यानंतर त्यांनी शिवागाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या पत्नी व मुलालाही मारहाण केली. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.