धक्कादायक ! मृतदेहावरील कफन चोरून विकणाऱ्या टोळीचा ‘पर्दाफाश’; 7 जण ‘गोत्यात’

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – कोरोना काळात लोक एमेकांना मदत करत माणुसकी जपत असताना माणुसकीला काळीमा फासण्याच्या घटना समोर येत आहेत. माणुसकीला काळीमा फासणारे काही महाभाग समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. अशीच एक धक्कादायक माहिती उत्तर प्रदेशातून समोर आली आहे.

स्मशानभूमीतून कपडे चोरून त्याची पुन्हा विक्री करत असलेल्या टोळीला उत्तर प्रदेशातील बागपत पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीला बरौत पोलिस ठाण्यातील पथकाने अटक केली आहे. पोलिसांना या टोळीच्या मास्टमाईंडसह सात जणांना अटक केली आहे. ही टोळी स्माशभूमीतून मृतदेहावर असलेल्या असलेल्या कफनाचे कपडे चोरत होती.

यानंतर, चोरी केलेले कपडे धुवून पुन्हा चढ्या दराने विकायचे. पोलिसांनी छापा मारुन या टोळीला पकडले. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात चोरलेले कापड जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रवीण जैन, श्रीपाल जैन, आशीष जैन, उदित जैन, श्रवण कुमार ऋषभ जैन, ईश्वर शर्मा (सर्व रा. गुराना रोड, बडौत) यांचा समावेश आहे. पोलीस आरोपींकडे सखोल चौकशी करत आहेत.