संशयित बलात्कार्‍यावर घडविला कुत्र्याचा हल्‍ला, बनवलं ‘नपुंसक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेक्सिकोमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका गँगने बलात्कार प्रकरणातील आरोपीवर कुत्रे सोडून त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे तो नपुंसक झाला आहे. येथील एका 30 वर्षीय तरुणाने तीन महिन्यांपूर्वी एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मोडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमधून समोर आलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला या बलात्काऱ्याचे हात बांधण्यात आले. त्यानंतर त्याला निर्वस्त्र करण्यात आले आणि त्यानंतर त्याच्या अंगावर कुत्रे सोडण्यात आले. कुत्र्याने हल्ला केल्यानंतर तो बचावासाठी आरडाओरडा करतो. त्यानंतर या हल्ला करणाऱ्या टोळीमधील एकाने या सर्व प्रकाराचा व्हिडीओ बनवला. मात्र या हल्ल्यानंतर त्या आरोपीचा मृत्यू झाला कि त्याचा जीव वाचला याची मात्र माहिती मिळू शकली नाही. स्थानिक वर्तमानपत्राच्या माहितीनुसार, स्थानिक गुंडाच्या टोळीनेच त्याच्यावर हा हल्ला केला होता. त्यानंतर इतर लोकांना धमकी म्हणून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला.

दरम्यान, मेक्सिकोमध्ये अशाप्रकारची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात असून गुंडांच्या टोळ्यांनी हल्ला करण्याचे प्रकार नवीन नाही. त्याचबरोबर संपूर्ण जगात मेक्सिकोमध्ये हत्यांचे प्रमाण जास्त असून आतापर्यंत मेक्सिकोमध्ये 17 हजार जणांची हत्या करण्यात आली आहे.

You might also like