सांगली पोलिसांची मोठी कारवाई ! दरोडा टाकणार्‍या टोळीतील 6 जणांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली Sangli आणि सातारा या दोन जिल्ह्यात विविध ठिकाणी दरोडा टाकणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीतील आठपैकी ६ जणांना अटक करून त्यांच्याकडून जवळपास पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) शाखेच्या पोलिसांना ही टोळी जेरबंद करण्यात यश आलं आहे. याबाबत माहिती सांगलीचे Sangli जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी दिली आहे यावेळी ते शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, LCB चे पीआय सर्जेराव गायकवाड आदी उपस्थित होते.

या टोळीतील संशयितांपैकी किरण उमाजी मलमे (वय २८, रा. एरंडोली) अमोल रमेश नाटेकर (वय, २२), अक्षय रामचंद्र चव्हाण (वय, २४, रा. दोघे तुपारी), सुनील सीताराम वडर (वय, २३), विजय संभाजी जाधव (वय, २४, रा. दोघे कुंडल), सूरज गणेश कोरडे (वय, २२, रा. ताकारी) अशा सहाजणांना अटक करण्यात आलं आहे. मिलिंद मुकुंद धेंडे (रा. एरंडोली, ता. मिरज) आणि विशाल कदम (रा. पलूस) यांचा पोलीस Police शोध घेत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिस हवालदार सुनील चौधरी यांना माहिती मिळाली की कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे २ वर्षांपूर्वी कुंडलिक पांडुरंग वासूदकर यांच्या घरावर दरोडा पडला होता. त्या दरोड्यातील संशयित पैसे आणि सोने वाटून घेण्यासाठी तुरची फाटा येथे आले आहेत. त्या ठिकाणी सापळा रचून पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता २ वर्षांपूर्वी कुकटोळी येथे दरोडा टाकल्याची कबुली त्यांनी दिलीय. वासुदकर यांनी त्यांची जमीन विकून आलेले १८ लाख ६२ हजार रुपये घरात ठेवले होते. त्यांचे घर गावाबाहेर असल्याने तेथे फारशी वस्ती नाही. त्यामुळे संशयित त्यावेळी रात्री दोनच्या दरम्यान कारमधून गेले.

या दरम्यान, संशयितांनी सातारा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी दरोडे घातले आहेत. त्या टोळीकडून रोख रक्कम ३० हजार १०० रुपये, २६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ दुचाकी, ५ मोबाईल असे एकूण एक लाख ७७ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी