दरोड्याच्या तयारीतील टोळी पिंपरी गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या सहा जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई दरोडा विरोधी पथकाने दिघी येथील भोसरी-आळंदी रोडवरील महापालिकेच्या कै. रामभाऊ गबाजी गवळी उद्यानाजवळ केली. त्यांच्याकडून ३ दुचाकी आणि हत्यारे असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कुंडलीक देवराम शेखरे (वय-२४ रा. भोसरी), रामेश्वर सोपान पांचाळ (वय-२८ रा. भोसरी), शुभम विठ्ठल निर्मळे (वय-२२ रा. भोसरी), रुपेश ज्ञानेश्वर देवकर (वय-२४ रा. आळंदी रोड), गजानन प्रेमराव फाजगे (वय-१९ रा. चक्रपाणी रोड, भोसरी), दयानंद महादेव सुरवसे (वय-१९ रा. पांडवनगर, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अनिकेत मोहिते आणि मनोज केंद्रे हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

भोसरी आळंदी रोडवरील उद्यानाजवळ सराईत गुन्हेगार दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती पोलीस शिपाई गणेश कोकणे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. अंधाराचा फायदा घेत त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता भोसरी येथील बाबर पेट्रोल पंपावर दरोडा घालण्यासाठी एकत्र जमल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन दुचाकी, दरोड्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उप निरीक्षक पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी गणेश हजारे, अजय भोसले, अशोक दुधवणे, निशांत काळे, किरण काटकर, प्रविण कांबळे, आशिष बनकर, गणेश कोकणे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like