संतापजनक ! 83 वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक ‘बलात्कार’, नराधमांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडमधून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. जेथे 83 वर्षीय वृद्ध महिलेवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. या आश्चर्यकारक घटनेने गावातील लोक संतप्त झाले आहेत. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन तुरूंगात पाठविले आहे. या दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

ही घटना झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील राजपूर परिसरातील आहे. राजपूर परिसरातील केंदुवा सहोर गावात गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. वृद्ध महिला घरी एकटी झोपली होती. तेवढ्यातच दारूच्या नशेत असणाऱ्या गावातील दोन तरुणांनी वृद्ध महिलेच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर बलात्कार केला. स्टेशन प्रभारी मनोज पाल यांनी सांगितले की, 22 वर्षीय राजेश कुमार सिंह आणि 19 वर्षीय रतन सिंह यांना अटक करण्यात आली आहे. जेव्हा या प्रकरणाची माहिती गावात पसरली, तेव्हा काही लोकांकडून यास रफा-दफा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडित महिलेला देखील पोलिसांकडे न जाण्याचा सल्ला देण्यात आला.

परंतु पीडितेने कुणाचेही ऐकले नाही आणि काठीचा सहारा घेत पोलिस ठाणे गाठले. जिथे वृद्ध महिलेने सर्व प्रकरण पोलिसांना सांगितले. वृद्ध महिलेची तक्रार ऐकून पोलिस ठाण्याचे सर्व पोलिसही आश्चर्यचकित झाले. या घटनेवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. यानंतर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले, त्यानंतर सर्वांसमोर सत्य उघड झाले. पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला आणि काही तासांत आरोपींना अटक केली. याप्रकरणी राजपूर पोलिस स्टेशन परिसरातील प्रभारी मनोज पाल म्हणाले की, आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यांच्याविरूद्ध कठोर शिक्षा होण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.