Gang Rape Case | सामूहिक बलात्कार प्रकरणी रितेश देशमुखाची कडक कारवाईची मागणी; म्हणाला – ‘त्या’ पोलिसाला भरचौकात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gang Rape Case | उत्तर प्रदेशमधील ललितपूर जिल्ह्यात बलात्काराची (Gang Rape Case) एक संतापजनक घटना घडली आहे. याचे पडसाद आता देशभर पसरले आहे. सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यासाठी आलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर (13 Year Old Minor Girls) पोलीस ठाण्यातही (Police Station) बलात्कार झाल्याचा आरोप आहे. पीडितेनं पोलीस स्टेशनच्या एसएचओवर (Station House Officer) सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) ट्वीट करत कारवाईची मागणी केली आहे.

 

ट्वीटमध्ये रितेश देशमुख म्हणत आहे की, ”हे खरे असेल तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. रक्षकच भक्षक झाला तर न्याय मागायला सामान्य माणसाने जायचे कुठे. अशा लोकांना भरचौकात सर्वांसमोर मारायला पाहिजे. यांच्यावर तात्काळ कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा द्या…” अशी मागणी रितेश देशमुखने केली आहे. (Gang Rape Case)

उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यातही बलात्कार झाल्याचा आरोप आहे. 13 वर्षीय पीडितेने पोलीस स्टेशनच्या एसएचओवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला. यानंतर स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) टिळकधारी सरोजला (Tilakdhari Saroj) अटक (Arrested) करण्यात आली. या प्रकरणी स्टेशन प्रमुखासह सहा जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.

 

दरम्यान, आधी 4 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर जेव्हा ती तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा एसएचओने पोलीस ठाण्यातच तिच्यावर बलात्कार केला.
पोलीस ठाण्यातील इतर सर्व पोलिसांना यापूर्वीच ड्युटीवरून हटवण्यात आले आहे.
असा आरोप पीडित तरुणीने केला.
या दरम्यान, याप्रकरणी पोलिस महासंचालक (DGP) स्तरावर चौकशी सुरू असून 24 तासांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Gang Rape Case | riteish deshmukh twitte on up cop who allegedly raped 13 years old rape survivor arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा