खळबळजनक ! उच्च शिक्षीत तरुणीला दारू पाजून केला सामुहिक बलात्कार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – उच्च शिक्षीत तरुणीला दारू पाजून तिच्याच नातेवाईकांच्या ओळखीच्या व्यक्तीने सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून हा प्रकार बेलतरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. पीडीत तरुणी बी.कॉम.च्या पहिल्या वर्षात शिकत असून ती आई आणि छोट्या भावासोबत राहते.

निखील सोमकुवर (वय-२५) आणि वतन गोमकाळे (वय-२५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणे १८ वर्षीय महाविद्यालयीन मुलीने पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पीडित तरुणीने फिर्य़ाद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार निखील सोमवकुंवर असल्याचे तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी निखील हा पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या ओळखीचा आहे. यामुळे पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. निखील मुंबईत काम काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो नागपूर येथे आला असून तो एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतो. तीन महिन्यापासून पीडित तरूणी आणि निखील हे फेसबुकवर मित्र झाले. यातून त्यांच्या मैत्रीत वाढ झाली. पीडीत तरुणीची आई सकाळी लवकर कामावर जाते तर लहान भाऊ शाळेत जातो. याच संधीचा फायदा घेऊन १७ जुलै रोजी आरोपी निखील पीडित तरुणीच्या घरी आला.

निखील याने तरुणीचा हात जबरदस्तीने हात पकडून तिला बेडरुममध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याची वाच्चता कोठे केल्यास आई आणि भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर निखील १९ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्याचा मित्र वतन गोमकाळे याला घेऊन घरी आला. त्याने सोबत आणलेली दारू बळजबरीने तरुणीला पाजली. दारूच्या नशेत दोघांनी तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान, मुलीच्या वागण्यामध्ये बदल दिसून आल्याने आईने नातेवाईकांच्या मदतीने तिच्याकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईक आणि पीडित तरुणीने बुधवारी बेलतरोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. पोलिसांनी आरोपींवर सामुहिक बलात्कार आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like