युवतीचा सामूहिक बलात्कार करून खून, प्रियकरासह तिघांना जन्मठेप

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – खानापूर तालुक्यातील गारडी येथील युवतीचा सामुहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणी तिच्या प्रियकरासह तिघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा मंगळवारी सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती उज्ज्वला नंदेश्‍वर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले.

लक्‍या उर्फ लक्ष्मण सरगर (वय २०), अनुज पवार (वय २१), दादासो आठवले (वय ३०, तिघे रा. गार्डी, ता. खानापूर) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत.

मृत युवती अनुमिती चव्हाण आणि लक्‍या सरगर हे दोघेही गार्डी येथील एका कोल्ड स्टोअरेजमध्ये कामास होते. त्यावेळी त्यांची एकमेकांशी ओळख झाली. या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यासाठीच ती १२ ऑक्‍टोंबर२०१२ मध्ये घरातून निघून गेली. त्यानंतर चारच दिवसांनी विटा-मायणी रस्त्यावरील पवई टेकाजवळील पडक्‍या विहिरीत तिचा मृतदेह सापडला होता. तिचा दोन्ही हात ओढणीने बांधलेल्या स्थितीतील मृतदेह सापडल्याने पोलिसांनी शंका व्यक्त केली. त्यानंतर विटा येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिचा तीन दिवसापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सामूहिक बालात्कार करून तिचा खून केल्याचेही उत्तरीय तपासणी अहवालात पुढे आले. खूनाचा गुन्हा दाखल करून त्या अनुषंगाने तपास करण्यात आला.

अनुमती लक्‍या सरगर याच्या प्रेमात असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सखोल चौकशी केल्यानंतर लक्‍या आणि त्याचा तीन मित्रांनी मिळून तिच्यावर सामूहिक बालात्कार करून खून केल्याची कबुली दिली. चौघेही पवई टेक येथे उभे असल्याचे साक्षीदार संदीप शिंदे यांनी पाहिले होते. त्यावेळी लक्‍या सरगर, अनुज पवार, दादासो आठवले आणि सागर हत्तीकर असे चौघे असल्याचे त्यांनी पाहिले होते, तशी साक्ष न्यायालयासमोर दिली होती. तत्कालीन निरीक्षक रवींद्र साळुंखे यांनी भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे २० साक्षीदार तपासण्यात आले. संदीप शिंदे, सुदाम चव्हाण, रणजित मोहिते, अनिल पाटील यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यानुसार न्यायालयाने शिक्षा सुनावली.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

Loading...
You might also like