अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दुखावल्यानं केली आत्महत्या, पोलिसांवर निलंबनाची कारवाई

चित्रकूट : पोलीसनामा ऑनलाइन –  हाथरस प्रकरण ताजे असतानाच चित्रकूट येथील अल्पवयीन मुलीने सामूहिक बलात्कार झाल्यानंतर आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, आयजी आणि कमिश्नर यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि कोतवाली प्रभारी व चौकी प्रभारीला निलंबित करण्यात आले. गावातील तणावपूर्ण वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

दुखावलेल्या अल्पवयीन मुलीने फास लावून घेतला

मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास १५ वर्षीय तरुणीने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेच्या काही काळापूर्वीच तिचे आई वडील घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या कॉलनीत गेले होते. त्याचवेळी अल्पवयीन तरुणीचा छोटा भाऊ घराबाहेर खेळत होता, त्याने बहिणीला घरात लटकताना पाहून आई वडिलांना माहिती दिली.

रडत आईने दिला जबाब

तपाणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना तरुणीच्या आईनं रडत सांगतिले की, ८ ऑक्टोबर रोजी रात्री १.३० च्या सुमारास घराबाहेर दुचाकीवरून आलेल्यांनी तरुणीचे अपहरण केले होते. सुमारे ५०० मीटर अंतरावर, तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यांनी तिचे हात पाय बांधून फेकले होते. शोध घेत असताना ती बांधलेल्या स्थितीत आढळली होती. याची माहिती पोलिसांनी दिला होती. मात्र स्थानिक प्रकरण असल्यानं तक्रार केली नाही. घटनेनंतर मुलगी दुःखी होती. दरम्यान, कर्वी कोतवाली पोलिसांनी सामूहिक बलात्कार, आत्महत्या, ओलीस ठेवणे, पॉक्सो आणि एससीएसटी कायद्यांतर्गत तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.

मृतदेह येताच गावात संताप अनावर

मंगळवारी सायंकाळी शवविच्छेदनानंतर अल्पवयीन तरुणीचा मृतदेह रात्री गावात आल्यावर लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. काही काळ गावातील वातावरण तणावग्रस्त होते त्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.

कोतवाली प्रभारी व चौकशी प्रभारी निलंबित

घटनेची माहिती मिळाली असताना देखील पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात कारवाई न केल्याचे समोर आले आहे. याबाबत एसपी अंकित मित्तल म्हणाले, कोतवाली प्रभारी जयशंकर सिंह आणि सरैयां चौकी प्रभारी अनिल साहू यांना माहिती असूनही कारवाई न केल्याबद्दल निलंबित केले आहे. मुख्य आरोपी किशनला अटक करण्यात आली आहे.