Gang Rape | खळबळजनक ! हुंडयासाठी पतीकडून पत्नीवर अमानवी अत्याचार, गुप्तांगात मिरची पूड टाकून मित्रांकडून बलात्कार

नवी दिल्ली (New Delhi) : वृत्तसंस्था – Gang Rape|राजस्थान राज्यातील (State of Rajasthan) धोलपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. तेथील बसेडी भागातील एका महिलेवर तिच्या पतीनेच पैसे घेऊन आपल्या मित्रांना आपल्या पत्नीवर बलात्कार (Rape) करण्याचे सांगितले. तर दोन दिवस या महिलेवर अनेकांनी बलात्कार (Gang Rape) केला आणि त्यासाठी पतीने त्या मित्राकडून पैसे घेतल्याची तक्रार या महिलेने केलीय. धक्कादायक बाब म्हणजे हुंडा दिला नाही म्हणून त्याची पैसे मिळवण्यासाठी तिच्या नवऱ्याने आपल्या पत्नीवर अत्याचार केला आहे.

Pune Municipal Corporation News | महापालिकेतील सहाय्यक आरोग्य प्रमुखांना ‘डॉक्टर्स डे’ निमित्त मनपा आयुक्तांचं गिफ्ट

याबाबत अधिक माहिती अशी की, 26 जून रोजी रात्री 12 च्या दरम्यान महिलेचा पती मित्रासह घरी आला आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. तिनं विरोध केला, ती ओरडू लागली तेव्हा तिच्या पतीने मित्राच्या मदतीनं तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि नंतर तिच्या गुप्तांगांत (Private Part) मिरची पूड घातली. इतकं करून देखील तो थांबला नाही, तर त्या क्रूर पतीने पत्नीच्या गुप्तांगांवर झंडू बाम लावला. त्यामुळे होणाऱ्या असह्य वेदनांमुळे ती बेशुद्ध पडली. आणखीही काही घाणेरडी कृत्यं देखील त्याने केलीय. तिला खोलीतच कोंडून ठेवून दुसऱ्या दिवशी आणखी काही लोकांनी देखील तिच्यावर बलात्कार केला आहे.

Ganesh Bidkar | सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार (Photos)

दरम्यान, या प्रकरणावरून महिलेनं आपला भाऊ आणि वाहिनी यांच्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये (Police station) धाव घेतली. सर्व हकीकत सांगताच पोलिसांनाही धक्का बसला. त्यांनी तक्रार नोंदवून घेत तिच्या नवऱ्याला आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी कारवाई सुरू केली. दरम्यान, तोवर तिचा पती आणि त्याचे कुटुंबीय घर सोडून पसार झाल्याचे कळले. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचं तपास अधिकारी प्रवेंद्र सिंह (Investigating Officer Pravendra Singh) यांनी सांगितलं आहे.

Delta variant । चिंताजनक ! भारत, अमेरिका, ब्रिटनसह तब्बल 100 देशात डेल्टा वेरिएंटचा प्रसार

Gang Rape | not getting dowry husband took money and rape wife with his friends

महिलेने अशी माहिती दिली की, 6 महिन्याआधी 14 जानेवारी 2021 रोजी तिचा विवाह झाला होता.
तिचा नवरा मार्बल फिटिंगचं काम करतो. विवाहानंतर काही दिवसातच तिच्या सासरच्या लोकांनी 3
लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तिचा छळ करायला सुरुवात केली. यावरून तिला मारहाण करण्यात येत
होती. तिनं तिच्या वडिलांना हे सांगितल्यावर ते तिच्या घरी आले आणि त्यांनी तिच्या सासरच्या
मंडळीशी बोलणी केली. त्यानंतर 26 जून रोजी तिच्या नवऱ्यानं तिच्यावर हे पाशवी अत्याचार केले
आहे.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gang Rape | not getting dowry husband took money and rape wife with his friends

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update