संतापजनक ! ‘बर्थडे’च्या बहाण्यानं 4 नराधमांकडून 44 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत चार नराधमांनी ४४ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानखुर्द परिसरात २४ जून रोजी घडलेला प्रकार काल रात्री उघडकीस आला. वाढदिवसाच्या बहाण्याने पीडित महिलेला घरी बोलवून कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकून गँगरेप झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

मुदस्सीर नवी शेख (वय ३०), अब्दुल शेख (वय ३४), मुराद शेख (वय २९), हैदल शेख (वय ३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. सर्व आरोप धारावीतील लेबर कॅम्प भागातील रहिवासी आहेत. आरोपी अब्दुल शेखने पीडित महिलेस त्याच्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस असल्याचं खोटं सांगून रहीम शेख याच्या घरी बोलवले होते. येथे पीडितेला कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या सर्व प्रकारानंतर आरोपींनी पीडितेला टॅक्सीतून घरी सोडलं.

दुसऱ्या दिवशी गुंगी उतरल्यानंतर पीडित महिलेला त्रास होऊ लागल्याने महिलेने वैद्यकीय तपासणी केली. यावेळी महिलेच्या अंगावर ठिकठिकाणी ओरखडल्याच्या जखमा दिसून आल्या. आरोपींनी आपल्याला गुंगीचं औषध देऊन आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याच पीडित महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर पीडित महिलेने १ जुलै रोजी चौघां आरोपींन विरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.