भावी पतीबरोबर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामुहीक बलात्कार

चमोर्शी (गडचिरोली) : पोलीसनामा ऑनलाईन

भावी पतीबरोबर जंगलात फिरायला गेलेल्या तरुणीवर चार जणांनी सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादाय घटना गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोर्शी तालुक्यात घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ही घटना २९ ऑगस्ट रोजी लालडोंगरी जंगल परिसरात घडली होती. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना गुरुवार (दि.६) पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
[amazon_link asins=’B01951R2S2,B01DU5OJCQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’61ce1407-af9a-11e8-81b4-0ddd06592c9c’]

निखील मंडल, महादेव बारई, राजेश डाकवा, स्वरुप मिस्त्री (सर्व रा.कृष्णनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी पिडित मुलगी आपल्या भावी पतीसोबत लालडोंगरी जंगल परिसरात फिरायला गेली होती. यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी दोघांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. तसेच त्यांचे मोबाईलवर छायाचित्र काढून सोशल मिडीयावर टाकण्याची भिती दाखवली. पतीने आरोपींना त्याच्याकडे असलेले पैसे दिले. मात्र, तरीही आरोपींनी तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला.

जाहिरात

पिडित तरुणीने चर्मोशी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. तरुणीच्या फिर्य़ादेवरुन पोलिसांनी सामुहीक बलात्काराचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे या करीत आहेत.

जाहिरात