Gang Rape | कंडोमने सोडवली केस, फिल्मी स्टाइलमध्ये गजाआड केले गँगरेप आणि खूनातील आरोपी

भिंड – वृत्त संस्था – Gang Rape | मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात कंडोममुळे (Condom) एका अज्ञात खूनाचा खुलासा झाला. भिंडच्या पोलिसांनी कंडोमच्या आधाराने खूनाचा गुंता सोडवत तीन आरोपींना अटक केली. पकडण्यात आलेल्या आरोपींनी एका महिलेवर सामुहिक बलात्कार (Gang Rape) करून तिची हत्या केली होती. हत्येनंतर तिचा मृतदेह गोणीत बंद करून केमोखरी गावाजवळ फेकून दिला होता.

17 जूनरोजी भिंड केमोखरी गावाजवळ रस्त्याच्या कडेला गोणीमध्ये बंद केलेला एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. बरासों पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृतदेहासोबत सरकारी कंडोमचे पॅकेटसुद्धा मिळाले होते. पोलिसांनी येथूनच प्रकरणाचा तपास सुरू केला. तसेच पोलिसांनी मृतव्यक्तीची माहिती देणारी पत्रके छापून आजूबाजूच्या जिल्ह्यात वाटली.

मृतदेहासोबत मिळालेल्या कंडोमच्या पाकिटावरील बॅच नंबरवरून शोध घेतला असता या बॅचचे कंडोम मिहोना सरकारी हॉस्टिपलकडून वितरित करण्यात आले होते. येथूनच पोलिसांना क्ल्यू मिळाला. इकडे पत्रक वाटण्याचा सुद्धा फायदा पोलिसांना झाला. कंपू पोलिसांकडे जेव्हा पत्रक पोहचले तेव्हा त्यांनी आपल्या पोलीस ठाण्यात दाखल रोशनी नावाच्या एका महिलेच्या केसबाबत भिंड पोलिसांना माहिती दिली.

यानंतर कंपू परिसरात राहणार्‍या रोशनीच्या कुटुंबियांची भिंड पोलिसांनी भेट घेतली. तिच्या कुटुंबियांनी मृतदेह ओळखला. सोबत कुटुंबियांनी सांगितले की रोशनीच्या पतीचा मृत्यू झाला आहे. यानंतर रोशनीच्या कुटुंबियांनी शामू नावाच्या एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला.

पोलिसांनी शामूला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबुल करत माहिती दिली की, 13 जूनरोजी रोशनी अंकित नावाच्या तरूणाशी विवाह करण्यासाठी मेहगाव येथे आली होती.

येथून रोशनी अंकितसोबत ररी गावात गेली होती,
परंतु ररी गावात पोहचल्यानंतर अंकितने विवाह करण्यास नकार दिला.
यानंतरही तिने घरी जाण्यास नकार दिला.
15 जून रोजी येथेच अंकित आणि त्याचे दोन साथीदार तारीफ खान
आणि सुमित दिवाकर यांनी रोशनीवर सामुहिक बलात्कार केला आणि तिची हत्या केली.
हत्या केल्यानंतर रोशनीचा मृतदेह गोणीत भरून रात्री मोटरसायकलवरून,
नेऊन केमोखरी गावाजवळ टाकला.

पोलिसांनी श्यामूसह अंकित आणि विक्की यांनाही अटक केली आहे,
तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच मोटरसायकल सुद्धा जप्त केली आहे.
आरोपींनी मृत रोशनीचा मोबाइल ओएलएक्सवर विकला होता.

Web Title : Gang Rape | police exposed gang rape with condom

eAadhaar | आधारसोबत नसताना कसे पूर्ण होईल बँकिंगपासून तिकिट घेण्यापर्यंतचे प्रत्येक महत्वाचे काम, UIDAI ने दिली मोठी अपडेट

Crime News | इमारतीवरून नवजात बालिकेला खाली दिले फेकून;
विरारमधील धक्कादायक घटना

‘कंगाल’ झालाय पाकिस्तान ! इस्लामाबादमध्ये पंतप्रधान निवासस्थान
भाड्याने देण्याची केली घोषणा