गंगा जगातील सर्वात प्रदूषित नदी : वर्ल्ड वाईड फंड

 नवी दिल्ली  : पोलीसनामा ऑनलाईन 

भारतातील सर्वात मोठी नदी असणारी गंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे . गंगा ही जगातील सर्वात प्रदूषित नद्यांपैकी एक आहे. ‘वर्ल्ड वाईड फंड’च्या अहवालानुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे . ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असणारी गंगा नदी ही जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफच्या अहवालातून गंगेची दुर्दशा अधोरेखित करण्यात आली आहे .

[amazon_link asins=’B01AH488VQ,B01HEMMZWC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97eb7305-af4e-11e8-802f-1f447c8789b1′]

२०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपानं देशवासीयांनी अनेक आश्वासनं दिली होती. यातील एक आश्वासन गंगा नदीच्या स्वच्छतेचं होतं. त्यासाठी “नमामि गंगे ” नावाचा प्रकल्प हाती घेतला होता . मात्र २०१९ ची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाही गंगा नदी स्वच्छ झालेली नाही.

जाहीरात

देशातील सर्वाधिक लांबीची गंगा नदी उत्तराखंडमध्ये उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते . गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमधून वाहते. या सर्वच राज्यांमध्ये नदीची स्थिती अतिशय वाईट आहे. जगभरातील समुद्रात जमा होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याच्या प्रदूषणातही गंगा नदी अग्रेसर आहे.

जाहीरात