Ganga Maha Aarti | गंगेनंतर आता नाशिकच्या दक्षिण गंगेची ही महाआरती, झाला ‘एवढा’ निधी मंजूर

Ganga Maha Aarti | modi govt sanction 5 crore fund for godavari river maha aarti like ganga aarti
file photo

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – दक्षिण गंगा (Dakshin Ganga) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीचा (Godavari) कायापालट होणार आहे. नाशिकच्या (Nashik) रामकुंड (Ramkund) येथे अयोध्या (Ayodhya), वाराणसी (Varanasi) आणि हरिद्वारच्या (Haridwar) धर्तीवर आता गोदावरी नदीची देखील रोज महाआरती (Ganga Maha Aarti) होणार आहे. पंचायतम सिद्धपीठमचे महंत अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungitwar) यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करत होते. आता, यासाठी केंद्र सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे अखेर गोदावरी नदीवरसुद्धा महाआरती (Ganga Maha Aarti) पाहण्याची संधी मिळणार आहे.

 

महाराष्ट्रातील गोदावरी नदीला देखील गंगा नदीप्रमाणेच धार्मिक महत्त्व आहे. हिंदू धर्मातील (Hindu Dharm) महत्वाचा कुंभ मेळा (Kumbh Mela) उत्सव नाशिकमध्ये नदीकाठी भरत असतो आणि याठिकाणी नागरिक अस्ती विसर्जनासाठी येत असतात. त्यामुळे गोदावरी नदीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळेच आता नाशिकच्या रामकुंड परिसरात गंगेप्रमाणे रोज महाआरती होणार आहे.

 

या महाआरतीसाठी केंद्र सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
लवकरच, या संदर्भात आराखडा तयार करून आरतीला सुरुवात केली जाईल.
नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता.
गंगा आरती उत्तरेत अत्यंत प्रसिद्ध असून आरती पाहण्यासाठी भारतातूनच नव्हे तर, परदेशातूनही लोक येतात.
आता नाशिकमध्ये गोदावरी नदीची देखील रोज महाआरती होणार असल्याने नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Web Title :- Ganga Maha Aarti | modi govt sanction 5 crore fund for godavari river maha aarti like ganga aarti

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prakash Ambedkar | मुख्यमंत्री भेटून गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी साधला माध्यामांशी संवाद, म्हणाले…

Eknath Khadse | साधना महाजन तुमच्या कुटुंबातीलच आहेत ना? – एकनाथ खडसे

Urfi Javed | आंतरराष्ट्रीय ग्लॅमर वर्ल्डमध्ये चालली उर्फी जावेदची जादू, होतेय टेलर स्विफ्टच्या फॅशनची चर्चा

Total
0
Shares
Related Posts
Maharashtra Assembly Election 2024 | sanjeevraje naik nimbalkar and deepak chavan join sharad pawar group ramraje nimbalkar not campaign for mahayuti

Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’