Gangadham Chowk Bibvewadi Pune News | गंगाधाम रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी अवजड वाहनांनवर तत्काळ निर्बंध घाला – प्रमोद नाना भानगिरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Gangadham Chowk Bibvewadi Pune News | अवजड वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी गंगाधाम रस्त्यावरील अवजड वाहनांवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी परिवहन आयुक्तांकडे केली, बुधवारी दि. १२ जून रोजी दुपारी १२च्या सुमारास गंगाधाम रस्त्यावर अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर एका भरधाव डंपरने दुचाकी वरून जात असणाऱ्या दोन महिलांना चिरडले व त्यातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला व दुसरी महिला गंभीर जखमी झाली अशा भीषण अपघाताची घटना समोर आली यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.(Gangadham Chowk Bibvewadi Pune News)

आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पाची कामे सुरु असल्यामुळे बांधकाम साहित्य घेऊन येणारे ट्रक, डंपर गंगाधाम रस्त्यावरून भरधाव वेगाने जातात. तेथील रस्त्यावरून जाताना तीव्र चढ असल्यामुळे व रस्ता अरुंद असल्यामुळे तिथे अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली होती मात्र, अवजड वाहनांसंदर्भात नव्याने आदेश काढल्यानंतर वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार तेथील रस्त्याच्या वाहतुकीवरील निर्बंध उठविण्यात आले परिणामी वाहतूक व्यवस्था खोळंबल्यामुळे त्या रस्त्यावर अपघातांच्या मालिका सुरु झाल्या आहेत.
तरी गंगाधाम रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी व वाहतूक सुव्यवस्था राखण्यासाठी अवजड वाहनांवर बंदी घालावी
यासाठी आज प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र ही देण्यात आले.परिवहन विभागाने तातडीने यावर कार्यवाही नाही केली
तर माझ्या नागरिकांसाठी मी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा थेट इशारा शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे
यांनी दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे शहरात विनापरवानगी अवजड वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करा, शरद पवार गटाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Ajit Pawar NCP – Devendra Fadnavis BJP | पुण्यातील दोन जागांवर अजित पवार गट आणि भाजपात जुंपली; निर्णयाकडे लक्ष

Sunetra Ajit Pawar | राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal | राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं छगन भुजबळांची नाराजी