कुख्यात गुंडाला पुणे गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गॅस गोडावूनमध्ये डांबून बांधून ठेवत बेदम मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गोट्या मुळेला गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने अटक केली. हा प्रकार शुक्रवारी (दि.७ जून) घडला होता. ही कारवाई मार्केटयार्ड येथील बैलबाजार येथे करण्यात आली.

या गुन्ह्यात यापूर्वी एकाला अटक करण्यात आली आहे. आतिष स्वामी पवार याला डांबून ठेवून मारहाण करण्यात आली होती. आतिष पवार याने गोट्या मुळे याच्या मित्रांना मारले होते. याच रागातून गोट्या मुळे याने ७ जून २०१९ रोजी आपल्या साथीदारांच्या मदतीने आतिष पवार याला गॅस गोडावून येथे गाठले. त्याला गोडावुनमध्ये डांबून ठेवून बेदम मारहाण केली. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार गोट्या मुळे हा मार्केटयार्ड येथील बैलबाजारात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बैलबाजार येथे सापळा रचून गोट्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गोट्या मुळे याच्यावर खंडणी, दरोड्याची तयारी, मारामारी, शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ चे पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, पोलीस कर्मचारी अमोल पवार, अनिल घाडगे, बाबा चव्हाण, वैभव स्वामी, अजय थोरात यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त – 

किमोथेरपी म्हणजे काय ? ती कर्करुग्णांसाठी वरदान ठरते का ?

रूग्णांना सुरक्षित रक्त मिळतेय का ?आधुनिक तपासणी गरजेची

प्राण्यांसाठी हव्यात ‘रक्तपेढ्या’