कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकलं ‘त्या’ 5 जणांनी, नंतर सामुहिक बलात्कार करून व्हिडीओ केला ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलवर जिल्ह्यातील सामूहिक बलात्कारानंतर आता पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे. अलवार जिल्ह्याच्या लक्ष्मणगड भागात राहणाऱ्या एका विवाहितेवर तिच्या दिराच्या मदतीने त्याच्या मित्रांनी आणि मित्रांच्या मित्रांद्वारे सामूहिक बलात्कार करण्यात आला, एवढेच नाही तर अश्लील व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला. सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पिडित महिलेने अलवर जिल्ह्यात लक्ष्मणगड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.

पीडिताने तक्रार दाखल केली की तिचे लग्न 9 वर्षापूर्वी भरतपूर जिल्ह्यात झाले होते, सासरकडून 1 वर्षापूर्वी तिच्या दिराने एका नातेवाईकांना तिचा मोबाइल नंबर देण्यात आला होता. नातेवाईकांकडून तिला अनेकदा संपर्क साधण्यात आला ज्याचा तिने विरोध केला, परंतू काही काळाने त्याने पिडित महिलेला आपल्या बोलण्यात फसवले आणि त्यानंतर ते मोबाइलवर बोलायला लागले.

एक दिवस महिला गोपाळगडला आली होती, तेव्हा तिला त्या नातेवाईकाने पाहिले. त्यानंतर त्याने महिलेला विचारले की कुठे चालली आहे, तेव्हा महिलेने सांगितले की ती माहेरी चालली आहे. तेव्हा त्याने तिला आपण त्याच दिशेने जात असून तुला सोडतो म्हणून सांगितले आणि रस्त्यात भरतपूरमध्ये एका हॉटेलमध्ये महिलेच्या इच्छेविरोधात तिच्यावर बलात्कार केला आणि तिला तिच्या माहेराजवळ सोडून कोणाला सांगिल्यास बदनाम करेल अशी धमकी दिली.

त्यानंतर घाबरलेल्या पिडितेने ही घटना कोणालाही सांगितली नाही. त्यानंतर त्या नातेवाईकाने तिचा नंबर इतर काही नातेवाइकांना दिला. त्यातील आरिफने तिला फोन करुन सांगितले की तिच्यात आणि तिच्या नातेवाईकाबद्दल मला माहिती आहे, त्यामुळे जर ती त्याच्या बोलावण्यावर आली नाही तर तिची आणि तिच्या नातेवाईकातील सत्य सर्वांना सांगून बदनाम करेल.

यामुळे पिडित महिला घाबरुन त्याच्याबरोबर गेली. आरोपीने पिडितेबरोबर दुष्कर्म केले. आरोपी जेसीबी मशीनवर काम करतो, दूसऱ्या दिवशी सकाळी आरोपीने महिलेला बसमध्ये बसवून महिलेला माहेरी सोडवले. त्यानंतर बकरी ईदला आरिफने तिला परत बोलावले, न आल्यास सर्वांना सांगेल अशी धमकी दिली. त्यामुळे महिली पुन्हा त्यांच्याबरोबर गेली आणि आरोपीने तिच्यावर हॉटेलमध्ये बलात्कार केला.

तेथे पाच व्यक्ती पहिल्यापासून बसले होते. शीत पेयात नशेचा पदार्थ टाकून तिला पाजून तिच्यावर दुष्कर्म करण्यात आला. त्यानंतर विवस्त्र करुन तिचा अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला, याला विरोध केला म्हणून तिला मारहाण करण्यात आली, मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील तयार करणात आला. तिला धमकी दिली की याची माहिती कोणाला दिली तर व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात येईल अशी धमकी दिली.

यानंतर महिलेने त्यांचे न ऐकल्याने आरोपींनी तिचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आणि तिला बदनाम करण्यात आले. त्यानंतर लक्ष्मणगड पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली.

लक्ष्मणगड ठाण्याचे उप निरिक्षक सुंदर शेखर यांनी सांगितले की एक विवाहितेद्वारे बलात्काराची तक्रार तिच्या पतीवर, दिरावर आणि त्याच्या मित्राविरोधात दाखल करण्यात आली आहे, व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर व्हायरल केल्याची तक्रार देखील करण्यात आली, तक्रारीनुसार पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like