कुख्यात गँगस्टरला ATS महिला पथकाने ठोकल्या ‘बेड्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरात एटीएस मधील महिलांच्या पथकाने जुसब अल्लारख्खा नावाच्या कुख्यात गँगस्टरला अटक केली आहे. गुजरात मधील जूनागढ आणि आसपासच्या जिल्ह्यात अल्लारख्खाची दहशत आहे. त्याच्यावर खून, लुटमारीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच गुजरात पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत होते.

महिला पथक आरोपीला पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यामध्ये चकमक झाली. अखेर महिला पोलिसांनी धाडसाने त्याला पकडून बेड्या ठोकल्या. अल्लारख्खा याच्यावर चार खून अणि लुटमारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गुजरात पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर एटीएस मधील महिला पथकाने ही कामगिरी करून दाखवली.

जुसब अल्लाऱख्खा हा गुन्हेगारांचा डॉन होता. त्याच्या गुन्हेगारी कुरापतीमुळे पोलिसांची डोकेदुखी बनला होता. एटीएसच्या पथकाला बोटाद जंगलामध्ये काही संशयास्पद लोक असल्याची माहिती मिळाली होती. एटीएसने गुन्हेगारांना पकडण्यासाठी एक पथक तयार केले होते. या पथकात या महिलांचा समावेश करण्यात आला होता. कुख्यात गँगस्टर अल्लारख्खा जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने अत्याधुनीक हत्यारांसह पथकाला जंगलाच्या दिशेने रवाना करण्यात आले. पथक जंगलात गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यामध्ये चकमक उडाली. अखेर कुख्यात गँगस्टरने महिला पथकासमोर शरणागती पत्कारत स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले.