शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरण : गँगस्टर अरूण गवळीची सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : गँगस्टर अरुण गवळी सध्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात अरुण गवळीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टात न्यायाधीश आर. भानुमती आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी सुरु असून कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. गवळीला दिलेले जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती.

मुंबईतल्या घाटकोपर असल्फा इथले शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची 2 मार्च 2007 ला हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात मारेकरांनी जामसांडेकर यांच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या होत्या. दरम्यान, या हत्येची सूपारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी साहेबराव भिंताडे यांनी दिल्याचं सिद्ध झालं. या खून प्रकरणी 15 आरोपींपैकी अरुण गवळीसह 12 जणांना विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तर 3 जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली होती.

दरम्यान, साहेबराव भितांडे हे शिवसेनेत उपशाखा प्रमुख असताना जामसांडेकर हे त्यांचे सहकारी होते. जामसांडेकर हे पहिल्यांदा अपक्ष निवडून आलेत. त्यानंतर त्यांनी भिंताडे यांचा तीन वेळा पराभव केला. यामुळे संतापलेल्या साहेबराव भिंताडे यांनी गवळी यांना तीस लाखाची सुपारी देत जामसांडेकर यांचा काटा काढला. हि सुपारी गवळीचे सहकारी प्रताप गोडसे आणि अजित राणे यांना दिली होती. विजय गिरीने नगरसेवक जामसांडेकर यांच्यावर गोळी झाडली.

फेसबुक पेज लाईक करा