पुण्यात कुख्यात गुंडांच्या टोळक्यानं फोडलं वाईन शॉप, मालकाकडे मागितली 25 लाखाची खंडणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात खुनाच्या घटना उघडकीस आल्या असताना उरळी कांचनमधील कोरोना मुळे येथे एका कुख्यात गुंडाने एका दारू विक्री करणाऱ्या व्यवसायिकाकडे 25 लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर या गुंडाच्या निकटवर्तीय असलेल्या सहा ते सात जणांच्या टोळक्याने व्यावसायिकाला मारहाण केली.
गोरख कानकाटे असे या कुख्यात गुंडाचे नाव असून विशाल सुभाष मोहेकर (रा. यशोलक्ष्मी अपार्टमेंट, शिवाजीनगर पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशाल मोहेकर यांचे जेनिथ वाईन्सचे दुकान आहे. गोरख कानकाटे याच्या निकटवर्तीयांनी विशाल यांना मारहाण करून 25 लाखाची खंडणी मागितली. विशाल मोहेकर यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मंगेश कानकाटे याच्यासह इतर सहा जणांवर खंडणी व मराहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

विशाल मोहेकर यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, विशाल हे दुकानात बसले असताना तोंडाला कपडा बांधलेला एक तरुण दुकानात आला. त्याने गोरख कानाकाटे याच्या कार्यालयातून फोन असल्याचे सांगून फोनवर बोलण्याचा दबाव टाकला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने मोहेकर यांना तुम्हाला जर या भागात धंदा करायचा असेल, तर तुम्हाला मंगेश कानकाटे याला 25 लाखाची खंडणी द्यावी लागेल. जर पैसे दिले नाही तर, तुम्हाला जिवे ठार मारीन, अशी धमकी देण्यात आली. यानंतर तो तरुण दुकानातून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी खंडणीच काय झाले असे म्हणत पाच ते सहा अनोळखी लोकं तोंडाला रुमाल बांधून आली. त्यांनी लाकडी दांडक्याने, लोखंडी रॉड, कुऱ्हाडीच्या सहाय्याने दुकानातील व्यवस्थापकाल बेदम मारहाण केली. खंडणीच्या उद्देशाने झालेली मारहणीवरून मोहेकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच टोळक्याने काही दिवसांपूर्वी उरुळी कांचन मधील भर चौकात एका पोलिसाला मारहाण केली होती. त्यामुळे पुणे ग्रामीण परिसरात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याचे पहायला मिळत आहे.