Gangubai Kathiawadi | अखेर आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ या दिवशी होणार प्रदर्शित..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Alia Bhatt | सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)’ मुळं प्रेक्षकांचा चांगलीच चर्चेत आहे. मात्र कोराना रोगाच्या पार्श्वभूमीमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकलण्यात आलं होतं. तसेच या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या (Gangubai Kathiawadi) प्रदर्शनाची तारीख बऱ्याचदा पुढे ढकलण्यात आली होती.

 

 

अखेर ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. हा चित्रपट लवकरच म्हणजे 25 फेब्रुवारीला प्रदर्शित करण्यात येणार आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी आपल्या ट्विटरवर केलीये.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित (Sanjay Leela Bhansali) हा चित्रपट (Gangubai Kathiawadi) गेल्या अनेक दिवसांपासून रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali), चित्रपटातील मुख्य अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) आणि इतर अनेक चित्रपटातील कलाकारांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. त्यामुळे चित्रपटचे शूटिंग देखील पुढं ढकलण्यात आलं होतं. मात्र अखेर लवकरच 25 फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून, रसिक प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे.

दरम्यान, या चित्रपटांमध्ये आलिया भट्टने (Alia Bhatt ) गंगुबाई काठियावाडी यांची भूमिका साकारली आहे. तर आलिया भट्ट प्रथमच आपल्याला हटके लूकमध्ये दिसणार आहे. तसेच चित्रपटाचे ट्रेलर आधीच प्रदर्शित झाला असून, ट्रेलरमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र वाढत्या कोरोनाच्या साथीमुळं प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असून, आता 25 फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

 

Web Title : Gangubai Kathiawadi | alia bhatt and sanjay leela bhansali film gangubai kathiawadi release date announced

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’