Gangubai Kathiawadi | ‘गंगुबाई काठियावाडी’ मध्ये विजय राज साकारणार ‘रजिया बाई’ हे पात्र, पात्रामुळं सोशल मीडियावर रंगला वाद-विवाद; नेटकरी म्हणाले – ‘Trans ला संधी का नाही?’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बहुप्रतीक्षित ‘गंगुबाई काठीयावाडी (Gangubai Kathiawadi)’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहून चाहत्यांना चित्रपटाची चांगली आतुरता लागली आहे. मात्र ट्रेलर मधून अभिनेता विजय राजचा रोल अनोखा असल्याचं दिसतंय. अलीकडेच आयुषमान (Ayushmann Khurrana) च्या ‘चंदिगड करे आशिकी (Chandigarh Kare Aashiqui)’ मध्ये वाणी कपूर (Vaani Kapoor) च्या पात्राबद्दल अनेक वादविवाद झाले होते. परंतु आता ‘गंगुबाई काठीयावाडी (Gangubai Kathiawadi)’ मधील विजयच्या पात्राबद्दल सोशल मीडियावर वाद-विवाद चांगलेच रंगले आहेत.

 

‘गंगुबाई काठीयावाडी (Gangubai Kathiawadi)’ याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ट्रेलरला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. ट्रेलरमधील आलियाची (Alia Bhatt) भूमिका पाहून चाहते चित्रपट बघण्यासाठी आतुर झाले आहेत. चित्रपटामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र चित्रपटामध्ये विजय राज (Vijay Raaz) एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानं एका महिलेचा पात्र साकारलं असल्याचं दिसत आहे. कदाचित त्याच्यासाठी ही भूमिका पूर्ण करिअरसाठी बेस्ट असू शकते.

 

 

‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटामध्ये विजय राजचा मेकअप, कपडे आणि बोलण्याची शैली मुलींसारखी आहे. त्याच्या एकंदरीत अभिनयावरून तो या अभिनयासाठी पूर्णत्वाला गेला आहे, अंस दिसतंय. ट्रेलरमधील त्याच्या अभिनयाला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. परंतु काही लोकांनी सोशल मीडियावर कास्टिंग काउच बद्दल अनेक प्रश्न उभारले आहेत.

 

ट्रेलरमधील त्याच्या या भूमिकेमुळे सोशल मीडियावर वादाचे वातावरण निर्माण झालं आहे. तर कमेंटमध्ये अनेक युजरनं त्याचं कौतुक केलंय. काही लोकांनी त्याला ट्रोलदेखील केलं आहे. कमेंटमध्ये एका युजरने त्याचं कौतुक करत लिहिलं की, ‘हे ट्रेलर बघितल्यानंतर एक गोष्ट पूर्ण झाली की, विजय राज आमच्यासाठी बेस्ट अभिनेता आहेत. त्यांच्या अभिनयानं अंगावर काटा येतो.’ तर दुसऱ्या युजरनं लिहिलं की, ‘सगळ्यांचाच अभिनय छान आहे, पण विजय राहत सगळ्यात वेगळा आहे. त्याने हे पात्र करण्यासाठी अथक प्रयत्न केलेत. तो अत्यंत ब्रिलियंट आहे.’

मात्र काही नेटकऱ्यांनी त्याच्या पात्रमुळे त्याला चांगलंच ट्रोल केला आहे.
तर एका युजरन कमेंट करून लिहिलं की,
‘बॉलीवूड cis/straight लोकांना ट्रांन्ससेक्सुअल पात्रामध्ये कास्ट करण्यास कधी बंद करणार? हे 2022 आहे.
या देशात खूप काही टॅलेंटेड लोक आहेत. या पात्राचं काम एक ट्रांन्ससेक्सुअल व्यक्ती सुद्धा करू शकते.’
तर अन्य युजरनं लिहिलं की, ‘गोष्ट प्रतिनिधित्व आणि संधीचं आहे.
ट्रान्स लोकांची संख्या कमी आहे आणि त्यांना सोशल मीडियावर कमी दाखवलं जातं.
त्यांना त्यांच्या बद्दल लिहिलेल्या पात्राबद्दल काम करण्याची संधी मिळत नाही.’

 

दरम्यान, ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटामध्ये विजयराज ‘रजिया बाई’चा पात्र असून, चित्रपटांमध्ये गंगुबाई म्हणजेच आलिया भट्टचा दुष्मन दाखवला आहे.
ट्रेलरमध्ये (Gangubai Kathiawadi Trailer) रजिया बाई (Rajiya Bai) आलिया भट्टला कामाठीपुरामधून बाहेर जाण्याची धमकी देत आहे.

 

 

Web Title :- Gangubai Kathiawadi | vijay raaz as trans woman in gangubai kathiawadi sparks debate among social media users

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | शुल्लक कारणावरून पतीने पत्नीला दिले पेटवून; पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या

 

Urfi Javed Backless Top Video | उर्फी जावेदनं फ्रंट आणि बॅक ओपन ड्रेसच्या नादात जे केलं… पाहा व्हायरल झाला व्हिडिओ

 

Lata Mangeshkar | 2 वर्षापासून गाठीभेटी टाळल्या, घराच्या बाहेरही पडल्या नाहीत, मग लतादीदींना कोरोनानं कसं गाठलं? जाणून घ्या