दीड दिवसांच्या बाप्पाला पुणेकरांनी दिला भक्तीपूर्ण वातावरणात निरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

काल गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन होते तोच आज दीड दिवसाच्या गणरायांना निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या जयघोषांत पुणेकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पुण्यातील ठिकठिकाणी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. दुपारी तीन नंतर सहकुटुंब विसर्जनाला सुरुवात झाली. यावेळी कुटुंबियांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. दीड दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी विसर्जन घाटावर 130 जीवरक्षक तैनात करण्यात आले होते.
[amazon_link asins=’B06Y5L25M4,B073JPC6R3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’700ad015-b83e-11e8-9f12-6131fc856436′]

श्री गणरायांची कालच म्हणजे चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती. काल रात्री व आज दुपारपर्यंत असा दीड दिवस पकडला जातो. त्यानुसार आज दुपारी तीननंतर अनेकांनी बाप्पाचे विसर्जन केले. विसर्जनापूर्वी बाप्पाची विधिवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून तलावावर व नदीच्या ठिकाणी गणरायाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विसर्जन घाटावर अग्निशमन दलाचे जवानाचा पहारा ठेवण्यात आला आहे. तसेच गणेशोत्सवाच्या काळात अग्निशमन दल जवानांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
[amazon_link asins=’B00NJ2M33I,B017HSSHS4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’76e25efe-b83e-11e8-8bfb-79404af82881′]

गणेशोत्सवाच्या कालावधीत पोलिसांप्रमाणेच अग्निशमन दल जवानांवर मोठी जबाबदारी असते. त्यानुसार आपत्तीच्या घटना टाळण्यासाठी आणि आपत्तीच्या ठिकाणी वेळेवर पोचण्यासाठी दरवर्षी नियोजन करण्यात येते. त्यानुसार यावर्षीही नियोजन करण्यात आले आहे. अमृतेश्‍वर, पुलाची वाडी, नटराज सिनेमाच्या जवळ, ओंकारेश्‍वर, वृद्धेश्‍वर, गरवारे कॉलेज जवळ, पांचाळेश्‍वर, अष्टभुजा गार्डन, संगम, बंडगार्डन, विठ्ठल मंदिर, खंडुजीबाबा चौक, बापू घाट, ठोसर पागा, चिमा उद्यान, दत्तवाडी, वारजे स्मशानभूमी आणि सिध्देश्‍वर मंदिराजवळ असलेल्या विसर्जन घाटांवर अग्निशामन दलाचे जवान आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. अशी माहिती अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
[amazon_link asins=’B06Y5FYBKP,B076HYJT12′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7de89df9-b83e-11e8-b595-49436bf2e825′]

गणेश विसर्जनाच्या वेळी घाटांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अग्निशामन दलाच्या वतीने विशेष दक्षता घेण्यात आली आहे. त्यानुसार याठिकाणी नेमण्यात आलेले जवान, जीवरक्षकांना सुरक्षेच्या दृष्टीने लाईफ जॅकेटस, लाईफबॉय, रात्रीच्या वेळी नजरेस पडतील असे फ्लोरोसेंट जॅकेटस उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच भाविकांनी नदीच्या पाण्यात उतरु नये यासाठी काठावर आडवा दोर बांधण्यात येणार आहे, त्याशिवाय नदीपात्रातही काहीठिकाणी आडवा दोरखंड बांधण्यात येणार आहे. त्यामुळे आपत्तीच्या घटनेच्या वेळी या दोरखंडाचा वापर करणे शक्‍य होणार आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी