माऊथवॉशनं गुळणी केल्यानं कमी होऊ शकतो ‘कोरोना’ व्हायरस, संशोधकांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संशोधकांनी एका अभ्यासानंतर म्हटले आहे की, बाजारात उपलब्ध असलेल्या माऊथवॉशने गुळणी केल्यास तोंड आणि घशातील कोरोना व्हायरसची संख्या कमी होऊ शकते. पीटीआयच्या वृत्तानुसार, जर्मनीच्या रूहर विद्यापीठातील संशोधकांनी अन्य संशोधकांसोबत मिळून माऊथवॉशचा उपयोग आणि कोरोना व्हायरसबाबत स्टडी केला आहे.

स्टडीत मॉऊथवॉशच्या वापराने शरीरातील कोरोना नष्ट होण्याचा दावा करण्यात आलेला नाही. परंतु, संशाधकांचे म्हणणे आहे की, तोंड आणि घशात मोठ्याप्रमाणात व्हायरस असतात. माऊथवॉशच्या वापराने व्हायरसला इनअ‍ॅक्टीव्ह केले जाते.

संशोधकांचे म्हणणे आहे की, तोंड आणि घशात जर व्हायरसची मात्रा कमी झाली तर विशिष्ट कालावधीपर्यंत संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. जर्नल ऑफ इन्फेक्शस डिसीजमध्ये हा स्टडी प्रकाशित झाला आहे.

सोबतच संशोधकांनी इशारा देखील दिला आहे की, माऊथवॉश कोरोना संसर्गासाठी उपयुक्त ट्रिटमेंट नाही आणि माऊथवॉश संसर्गाला पूर्णपणे रोखूही शकत नाही.

स्टडीत म्हटले आहे की, प्रामुख्याने संसर्ग हा संक्रमित व्यक्तीच्या श्वासातून सोडले गेलेल्या व्हायरसच्या कणांच्या संपर्कात आल्याने होतो. यामुळे माऊथवॉशने गुळणी केल्याने संसर्गाची शक्यता कमी होऊ शकते. परंतु, या विषयावर आणखी क्लिनिकल रिसर्चची आवश्यकता आहे.