आरोग्य विभागाचा ‘प्रताप’ ! आता याला काय म्हणावं, पती-पत्नीने केली नसबंदी; तरीही पत्नी ‘प्रेग्नंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक किंवा दोन अपत्य झाले किंवा अपत्य नको या हेतूने अनेक विवाहित महिला-पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करत असतात. पण अशाच एका जोडप्याने अपत्य नको म्हणून नसबंदी शस्त्रक्रिया केली होती. मात्र, तरीदेखील संबंधित महिला प्रेग्नंट राहिली. त्यामुळे नसबंदी शस्त्रक्रियेवर चर्चा सुरु आहे. झारखंडच्या गढवा येथे ही घटना समोर आली. या जिल्ह्यातील एका विवाहित जोडप्याने नसबंदी शस्त्रक्रिया केली होती. मात्र, नसबंदी शस्त्रक्रियेच्या पाच वर्षानंतर त्यांनी एका बाळाला जन्म दिला.

36 वर्षीय रशिदा असे या महिलेचे नाव आहे. रशिदा यांनी सांगितले, की 17 जानेवारी, 2013 मध्ये त्यांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर दोन वर्षांनंतर त्यांचे पती सज्जाद अन्सारी यांनीही रुग्णालयात जाऊन नसबंदी शस्त्रक्रिया केली होती. या दोघांनाही आरोग्य विभागाकडून सर्टिफिकेट देण्यात आले आहे. मात्र, नसबंदी शस्त्रक्रिये नंतरही रशिदा प्रेग्नंट राहिली. तिने सदर रुग्णालय गढवा येथे 30 ऑक्टोबर, 2017 मध्ये त्यांनी एका बाळाला जन्म दिला.

नुकसान भरपाईसाठी अर्ज
रशिदा यांची नसबंदी शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडली. तसेच जन्मलेल्या बाळाची प्रकृतीही ठिक नसते. नसबंदी शस्त्रक्रियेनंतरही बाळाला जन्म दिल्याने आरोग्य विभागाला माहिती दिल्यानंतर 2018 मध्ये नुकसान भरपाईसाठी अर्ज केला आहे.

आरोग्य विभागाचा ‘प्रताप’
रशिदा आणि त्यांचे पती सज्जाद यांनीही नसबंदी शस्त्रक्रिया केली होती. पण आरोग्य विभागाकडूनच योग्य खबरदारी न घेतल्यामुळे नसबंदी शस्त्रक्रियेत त्रुटी राहिल्याचे सांगितले जात आहे.