प्रसिद्ध अभिनेत्री रीना रावतचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तराखंडातील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री रीना रावतचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही दुःखद घटना गुरुवारी घडली असून चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे.

या अभिनेत्रीच्या निधनाची बातमी कळताच सिनेमा आणि संगीत क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. अशी माहिती मिळत आहे की, अभिनेत्री रीनाची तब्बेत काही दिवसांपासून ठिक नव्हती. रीनाने ‘पुष्पा छोरी…’ या लोकगीतासोबतच ‘भग्यान बेटी’, ‘मायाजाल’, ‘फ्योंली ज्वान व्हेगी’ या सुपरहिट गाण्यांमध्ये तिने अभिनय देखील केला आहे.

https://www.instagram.com/p/Bwtc3joBbYu/

त्याचबरोबर रीना रावतने उत्तराखंडच्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. यामध्ये पन्नू गुंसाई, जयपाल नेगी, गीता उनियाल सारख्या मान्यवरांची नावे आहेत. रीना 38 वर्षाची होती. तिने लहान वयातच आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासोबतच तिने लोककला आणि संस्कृतीच्या संरक्षणात महत्वाची भूमिका बजावली आहे.

https://www.instagram.com/p/BxaHVwEhzmT/

सोशल मीडियावर रीनासोबतच्या अनेक आठवणी अभिनेता पन्नू गुंसाई यांनी शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांचा टिकटॉक व्हिडिओ देखील आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून रीनाच्या जाण्याचे दुःख व्यक्त केले आहे. रुग्णालयात असताना तिने एकदा पन्नू यांच्याशी संपर्क साधला होता.

रीनाचे दिल्लीच्या रुग्णालयात उपचार चालू होते. 2005 मध्ये रीनाचे लग्न झाले होते. तिला एक मुलगा सुद्धा आहे. तिचा पती दीपिक रावत एका सरकारी कार्यालयात काम करतो. 2000 पासून जवळपास 8 ते 10 वर्ष रीना रावत उत्तराखंडच्या सिनेमांमधील आघाडीची अभिनेत्री होती.