काही आजारांत ‘लसूण’ खाणे आहे धोकादायक ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – लसूण औषधी असून विविध प्रकारच्या आजारात त्याचा वापर औषध म्हणून केला जातो. लसूणाने पदार्थांची चव वाढते. त्यामुळे बहुतांश पदार्थांमध्ये लसूण टाकला जातो. प्रत्येक स्वयंपाक घरात लसूण असतो. मात्र, काही लोकांसाठी लसूण हानिकारक ठरू शकतो. लसूण हे गरम आणि कोरडे असल्याने अनेक आजारांमध्ये हे खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.

जास्त लसूण खाल्ल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. पहिल्यापासून ही समस्या असेल तर लसूण खाऊ नये. तसेच एनीमिया असणाराने लसूण खाल्ल्यास हीमोलिटिक एनीमिया म्हणजेच हीमोग्लोबिनची कमतरता होऊ शकते. यकृताची समस्या असल्यास लसूण खाऊ नये. जास्त लसूण खाल्ल्याने ही समस्या वाढू शकतात. तसेच पोटाच्या समस्या म्हणजे अल्सर, डायरियासारख्या समस्या असतील तर लसूण खाऊ नये.

गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना जास्त लसुण खाल्ल्याने गर्भनिरोधक गोळ्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो. लसुण गरम असल्यामुळे गरोपदरपणात जास्त गरम खाल्ल्याने गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. होमिओपॅथिक औषधी घेणा-यांनी लसुण खाऊ नये. यामुळे औषधांचा प्रभाव होत नाही. सर्जरी करणार असाल तर लसूण खावू नये. कारण लसुण खाल्ल्याने रक्त पातळ होते. सर्जरीच्या वेळी रक्तप्रवाह होऊ शकते. शिवाय लसणाची अ‍ॅलर्जी असताना लसूण खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. लसुण रक्त पातळ करते. त्यामुळे रक्त पातळ होण्याची औषध सुरू असल्यास त्रास होऊ शकतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/