लसूण ‘या’ 10 आजारात लाभदायक, जाणून घ्या शरीरासाठी किती ‘इफेक्टिव्ह’!

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  शाकाहरी असो की मांसाहारी महाराष्ट्रीयन पद्धतीच्या बहुतांश पदार्थांमध्ये लसून आवर्जून वापरला जातो. आयुर्वेदामध्ये सुद्धा लसणाचे महत्व सांगितले आहे. लसणात अनेक औषधी गुणधर्म असल्याने अनेक आजारांवर तो गुणकारी आहे. लसणात व्हिटामीन बी 1, बी 6, कॅल्शियम आणि सेलेनियम तसंच मॅगनीज हे पोषक घटक असतात. लसणाचा आहारात समावेश केल्याने असंख्य आजार दूर राहू शकता. लसूण सेवन करण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या.

हे आहेत फायदे

1  पुरूषांची लैंगिक समस्या दूर होते.असातात अशा लोकांनी लसणाचे सेवन केले जर शरीरासाठी फायदेशीर ठरेल.

2  सर्दी, खोकला, दमा, निमोनिया या आजारांवर लसूण गुणकारी आहे.

3  शरीरात विषारी घटक काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे.

4  सकाळी रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्यास गॅस, अपचन, पोट साफ न होणे सर समस्या दूर होतात.

5  कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते.

6  रक्ताचे शुद्धीकरण होते. रक्त पातळ होते. त्यामुळे रक्ताच्या गाठी होत नाहीत.

7  लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवतो.

8  सल्फरयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही.

9  रक्ताची कमतरता दूर करण्यास फायदेशीर आहे.

10  स्कर्वी रोगापासून बचाव होतो.