Garlic | तुम्हाला लसून खुपच आवडतो का? तर व्हा सावध! अति सेवन केल्याने लिव्हरचे होऊ शकते नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Garlic | भारतीय जेवणात मसाला म्हणून वापरला जाणारा लसून (Garlic) जेवणाची चव वाढवतो. तसेच तो अनेक आरोग्य समस्यांवर सुद्धा गुणकारी आहे. लसण्याच्या दोन पाकळ्या रिकाम्या पोटी खाण्याचा सल्ला आयुर्वेदात देण्यात आला आहे. लसून रोग प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवतो.

 

लसणाच्या अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की जास्त सेवन केल्यास लसून धोकादायक ठरू शकतो (Excessive consumption of garlic can cause liver damage). याच्या गुणधर्मामुळे कर्करोगासारख्या (Cancer) घातक आजारात सुद्धा तो उपयुक्त मानला जातो, परंतु त्याचे जास्त प्रमाणात सेवन पचनक्रियेसाठी (Digestive system) आणि एकुणच शरीरासाठी हानिकारक आहे. (Garlic)

 

लिव्हर हा शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे कारण ते रक्त शुद्ध करणे (blood purification), चरबीचे पचन (fat metabolism) आणि शरीरातून अमोनिया (Ammonia) काढून टाकणे यासारखी अनेक कामे करते. संशोधनानुसार, लसणामध्ये अ‍ॅलिसिन नावाचे एक संयुग असते, जे जास्त प्रमाणात घेतल्यास लिव्हरची विषक्ता (Liver Toxicity) वाढू शकते.

 

मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक :
गर्भवती महिलांनी लसूण खाणे टाळावे कारण लसणाचा स्वभाव उष्ण आहे. गरोदर स्त्रिया किंवा स्तनपान देणार्‍या महिलांनी या काळात लसूण खाणे टाळावे. स्तनपान करणार्‍या महिलांनी लसूण जास्त खाल्ल्यास आईच्या दुधाची चव बदलते जी बाळासाठी चांगली नसते.

अधिक रक्तस्त्राव :
लसणात रक्त पातळ करण्याचे गुणधर्म आहेत. जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवू शकते.
तसेच श्वासाची दुर्गंधी येऊ शकते. कच्च्या लसणात अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, याच्या जास्त सेवनाने लिव्हरमध्ये टॉक्सिसिटी होऊ शकते.

 

रक्तदाब कमी होऊ शकतो :
लसणाच्या सेवनाने बीपी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. परंतु, जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो.
लसून उष्ण असल्याने याच्या सेवनाने जास्त घाम येतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Garlic | excessive use can cause damage to the liver so be careful know the side effect and benefits of garlic

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | दारु पिता का? या वादग्रस्त व्हिडिओवर अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण – म्हणाले…

Andheri Bypoll | शिवसेनेचे टेन्शन वाढले! ‘या’ उमेदवाराची अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची आयोगाकडे केली मागणी

Naresh Mhaske | ‘ठाकरेंकडे जेव्हा सत्ता होती, तेव्हा शेतकऱ्यांसाठी काही केले नाही’ – नरेश मस्के