Garlic Health Benefits | जर लसणाला आले कोंब तर फेकू नका, यापासून आरोग्याला होतात अनेक फायदे; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Garlic Health Benefits | बहुतेक लोकांना त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे योग्य आहार घेता येत नाही. त्यामुळे पोषक तत्वांच्या (Nutrients) कमतरतेमुळे केवळ त्यांच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर शरीरातील इम्युनिटी (Immunity) कमी झाल्यामुळे वेळेपूर्वीच अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. पण आहारात अंकुरित लसणाचा (Garlic) समावेश करून तुम्ही आरोग्याशी संबंधित सर्व समस्यांवर मात करू शकता. (Garlic Health Benefits)

 

अंकुरलेल्या लसूणमध्ये प्रोटीन (Protein), कार्बोहायड्रेट (Carbohydrates) आणि डाएटरी फायबर (Dietary Fiber) भरपूर प्रमाणात असते. यासोबतच त्यातील अँटी-ऑक्सिडंट घटक शरीराची इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. दुसरीकडे, ताज्या लसणापेक्षा अंकुरलेल्या लसूणमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात आढळतात. म्हणूनच तज्ज्ञ देखील अंकुरलेला लसूण खाण्याचा सल्ला देतात. onlymyhealth नुसार अंकुरलेल्या लसणाचे काही खास फायदे जाणून घेवूयात. (Garlic Health Benefits)

 

कॅन्सरसोबत लढण्यासाठी उपयुक्त (Garlic Is Useful For Fighting Cancer)
कॅन्सर (Cancer) हा जगभरातील एक गंभीर आजार आहे. हा रोग जितका धोकादायक आहे तितकाच त्यावर उपचार करणे कठीण आहे. मात्र लसणामुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म कर्करोगाचा सामना करण्यासाठी प्रभावी आहेत.

 

हृदय निरोगी ठेवते लसूण (Garlic Keeps The Heart Healthy)
अंकुरलेल्या लसणात एन्झाइम घटक आढळतात. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. दुसरीकडे अंकुरित लसणाचे रोज सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकार यांसारखे आजारही टाळता येतात.

 

इम्युनिटी वाढवतो लसूण (Garlic Enhances Immunity)
अंकुरलेल्या लसणामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. यामुळेच लसणाचे सेवन केल्याने संसर्ग आणि विषाणू दूर राहण्यास मदत होते.

कमी होईल स्ट्रोकचा धोका (Reduce The Risk Of Stroke)
शरीराच्या एखाद्या भागात वारंवार रक्त जमा झाल्यामुळे पक्षाघाताचा धोका वाढतो. पण भरपूर एन्झाइम्स असल्यामुळे लसणाचे सेवन स्ट्रोकची शक्यता कमी करण्यात प्रभावी ठरते. दुसरीकडे, अंकुरलेल्या लसणात नायट्रेट्स आढळतात, जे रक्तवाहिन्या पसरवून रक्त गोठण्यापासून प्रतिबंधित करते आणि शरीरात रक्ताभिसरण सुधारण्याचे काम करते.

 

लसणात आहेत अँटी एजिंग गुणधर्म (Garlic Has Anti-Aging Properties)
आहारात लसणाचा समावेश करून तुम्ही वाढत्या वयाचा प्रभाव कमी करू शकता.
यासोबतच सुरकुत्या, मुरुमांची समस्याही लसणाच्या सेवनाने दूर होऊ शकते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Garlic Health Benefits | sprouted garlic benefits for health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना मोठा झटका ! 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

SPPU On Online Exam Copy | कॉपी बहाद्दरांना ‘फौजदारी’चा दणका ! परीक्षेत कॉपी करताना आढळून आल्यास खावी लागणार थेट जेलची हवा

 

Pune Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाला पोटचा 13 वर्षाचा मुलगा ठरत होता अडथळा, परकरच्या नाडीने आईने आवळला गळा