गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात 13 जण गंभीर जखमी (Live व्हिडीओ)

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील मोहल्ला शेखपुरा परिसरात आज झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये 13 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यापैकी 9 जणांची प्रकृती गंभीर असून जखमींवर जयपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे.

सीकर येथील जिल्हा मुख्यालयाच्या शेखपुरा परिसरातील कुरेसिया क्वार्टर इमारतीमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटामुळे इमारतीतून आगीचे लोट बाहेर पडले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमींना जयपूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 9 जण गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

https://twitter.com/dinkarsr11/status/1227869915685588992

अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दखल करण्यात आले. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही.