गॅसचा स्फोट झाल्याने पाणीपुरी विक्रेता ठार, दुसरा ८० टक्के भाजला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – चाकण येथील खराबवाडी येथे आज सकाळी साडे चारच्या सुमारास गॅसचा स्फोट झाल्याने एका पाणीपुरी विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला तर एकजण ८० टक्के भाजला आहे.

मांगीलाल चौधरी (३५, रघुनाथ खराबी यांचे रूम, ज्ञानेश मंदिराजवळ खराबवाडी, चाकण) यांचा मृत्यू झाला आहे. तर ओमप्रकाश शंकरलाल लोहार (मूळ -राजस्थान) हा ८० टक्के भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाड़ी येथे एका खोलीत पाणीपुरी विक्रीचे काम करणारे राहतात. आज सकाळी साडे चारच्या सुमारास नेहमीप्रमाणे हे उठले. एकजण भाजी आणण्यासाठी बाहेर गेला. तर एक गॅस चालू करत होता त्यावेळी एकाने सिगरेट पेटवली असता गॅसचा स्फोट झाला.

या स्फोटात गॅस पेटविण्यासाठी गेलेल्याचा पेटून मृत्यू झाला. तर दूसरा गंभीररित्या भाजला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चाकण पोलिस घटनास्थळी पोहचले असून तपास सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय 

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक 

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे 

चमकणाऱ्या ‘विजांपासून’ असा करा स्वतःचा बचाव 

Loading...
You might also like