Gas Cylinder | एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची दुर्घटना झाल्यास मिळेल 50 लाखाचा फायदा ! तात्काळ जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : Gas Cylinder | स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर (Gas Cylinder) सर्वच घरांमध्ये असतो. परंतु, याचा वापर करताना खुपच सावधगिरी बाळगावी लागते. अनेकदा यामध्ये मोठ्या दुर्घटना सुद्धा घडतात. अशावेळी, गॅस सिलेंडर वापरताना सतर्कता आवश्यक आहे. तरीसुद्धा जर एखाद्या प्रकारची दुर्घटना घडली तर ग्राहक म्हणून 50 लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळू शकते.

50 लाख रुपयांपर्यंतचा फ्री इन्श्युरन्स

LPG म्हणजे स्वयंपाकांचे गॅस कनेक्शन (Gas Cylinder) घेतल्यास पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांना पर्सनल अ‍ॅक्सीडेंट कव्हर उपलब्ध देतात. 50 लाख रुपयांपर्यंतचा हा इन्श्युरन्स एलपीजी सिलेंडरमधून गॅस लीकेज किंवा ब्लास्टमुळे दुर्घटनेत आर्थिक मदत म्हणून दिला जातो.

यासाठी पेट्रोलियम कंपन्यांची विमा कंपन्यांसोबत भागीदारी असते. भरपाईची जबाबदारी गॅस कंपनीची असते. दुर्घटनेत ग्राहकाच्या प्रॉपर्टी/घराचे नुकसान झाले तर प्रति अ‍ॅक्सीडेंट 2 लाख रुपयांपर्यंतचा इन्श्युरन्स क्लेम मिळतो. एक व्यक्तीला कमाल 10 लाख भरपाई दिली जाऊ शकते.

असा करा क्लेम

1. LPG सिलेंडरचे विमा कव्हर मिळवण्यासाठी दुर्घटनेची माहिती ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशनला आणि एलपीजी वितरकाला द्यावी लागते.

2. ही विमा पॉलिसी ग्राहकाच्या व्यक्तीगत नावाने नसते. कंपनीने घेतलेल्या पॉलिसी प्रत्येक ग्राहक कव्हर होतो. यासाठी ग्राहकाला प्रीमियम नाही.

3. FIR ची कॉपी, जखमींच्या उपचाराच्या पावत्या आणि मेडिकल बिले तसेच मृत्यू झाल्यास पोस्टमार्टेम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र सांभाळून ठेवा.