बदलापूरातील केमिकल कंपनीतून वायू गळती; 3 किमी परिसरातील नागरिकांना झाला श्वसनाचा त्रास

बदलापूर : वृत्त संस्था – बदलापूर (badlapur)  येथील शिरगाव एमआयडीसी परिसरातील एका कंपनी (chemical company) त वायू गळती झाल्याने सुमारे ३ किमी परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास व डोळे चुरचुण्याचा त्रास होत होता. बदलापूर ( badlapur ) आणि अंबरनाथ अग्निशमन दलाच्या जवानांना सुमारे तासाभरानंतर ही वायू गळती थांबविण्यात यश आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी गॅस गळती व श्वसनाच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले तर काही नागरिकांनी या घटनास्थळापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला.

शिरगाव एमआयडीसीमधील नोबेल इंटरमिडिएट्स या कंपनीमध्ये ओव्हर हिटमुळे सल्फ्युरिक अ‍ॅसिड व बेंझिल्स अ‍ॅसिडमध्ये केमिकल रिअ‍ॅक्शन होऊन गॅस गळती झाली होती.
रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
कंपनीतील सिअक्टरमध्ये सल्फ्युरिक अ‍ॅसिड आणि मिथाईल बेंझाईन एकत्र केले जात होते.
मात्र, त्यात सल्फ्युरिक अ‍ॅसिड जास्त पडल्याने अचानक रिअ‍ॅक्टरचे तापमान वाढले व त्यातून गॅस लिंक होऊ लागला.

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

 

हा गॅस ज्वलनशील नसला तरी त्यामुळे परिसरातील लोकांना श्वास घ्यायला त्रास होण्यास सुरुवात झाली. कंपनीतून बाहेर पडणार्‍या वायूचे ढग दूरवरुनही आकाशात जात असल्याचे दिसत होते. याबाबतची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी या कंपनीत धाव घेतली व तेथील गॅसचे नॉब बंद करुन वायू गळती थांबविली. या घटनेत कोणालाही इजा झालेली नसल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी सांगितले. सुमारे एक तास ही वायू गळती होत होती. त्यामुळे परिसरात सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलने मोडले सर्व विक्रम, सतत होतेय महाग, जाणून घ्या आजचे दर

Coronavirus In India Updates : लागोपाठ कमी होत आहेत केस, देशात कोरोनाची 1.31 लाख नवी प्रकरणे, 2,706 लोकांचा मृत्यू