कुरकुंभ MIDC मधील कंपनीत पुन्हा एकदा वायू गळती, कामगार व नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकलच्या कंपन्यांमध्ये स्फोट होणे, आग लागणे, वायू गळती होणे हे प्रकार थांबण्याचे काही नाव घेत नाहीयेत. रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारीही मॉडेप्रो प्रा.ली. या कंपनीमध्ये थाईनायल क्लोराईड या केमिकलने भरलेल्या बॅरलमधून अचानक वायू गळती होण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. वायुगळतीच्या या प्रकारामुळे कंपनीच्या परिसरात धुरच धूर दिसत होता. या धुराने कामगार व नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Kurkumbh
आठ दिवसापूर्वीच अल्काईल अमाईन्स या कंपनीमध्ये भीषण आग लागण्याचा प्रकार घडला होता. या आगीच्या भीतीने कुरकुंभ परिसरातील नागरिक घरे सोडून दहा किलोमीटर अंतरावर सुरक्षित स्थळी गेले होते. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच आज पुन्हा मॉडेप्रो कंपनीत थाईनायल क्लोराईड या केमिकलने भरलेल्या बॅरलमधील केमिकल ची वायू गळती झाल्याने कंपनी परिसरामध्ये असणाऱ्या नागरिक आणि कामगारांमध्ये भीती पसरली होती. कुरकुंभ एमआयडीसी मध्ये कायमच असले प्रकार घडत असल्याने येथील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेबाबत औद्योगिक सुरक्षा अधिकारी अखिल घोगरे यांनी मॉडेप्रो केमिकल कंपनीने सुरक्षा साधनांची पूर्णपणे व्यवस्था करेपर्यंत कंपनी बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –