भिलाई स्टील प्लांटमध्ये स्फोट, नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

रायपूर : वृत्तसंस्था

छत्तीसगडमधील भिलाई स्टील प्लांटमध्ये झालेल्या स्फोटामध्ये नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू , तर 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. छत्तीसगड सरकारच्या ‘स्टील ऑथरिटी ऑफ इंडिया’ (सेल) मार्फत हा प्लांट चालवला जातो. आज या प्लांट मध्ये सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1783c658-cbae-11e8-a045-6f8469a6cd22′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , भिलाई स्टील प्लांटमध्ये सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी स्फोट झाला. हा स्फोट तेथे असणाऱ्या गॅसच्या पाईपचा झाला आहे अशी माहिती मिळते आहे. आज या स्टील प्लांट मध्ये गॅस पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात येत होती. त्याच वेळी मोठा स्फोट झाला आणि या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. राजधानी रायपूरपासून 30 किमी अंतरावर दुर्ग जिल्ह्यात हा प्लांट आहे. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी सहा अग्निशामक दलाच्या गाड्या आग विझवण्याचे काम करीत आहेत.

भारतीय रेल्वेच्या जागतिक दर्जाच्या रुळांसाठी ‘भिलाई स्टील प्लांट’ हा देशातील एकमेव उत्पादक आणि पुरवठादार आहे. भिलाई स्टील प्लांटच्या आधुनिक आणि विस्तारित प्रकल्पाचं जून महिन्यात पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं होतं.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1f76d70e-cbae-11e8-8f21-d95ca9439a09′]

कोक ओव्हन जवळ सुरु होते काम

दुर्ग जिल्ह्यातील पोलीस महानिरीक्षक जीपी सिंह यांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भिलाई स्टील प्लांट मधील झालेल्या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. आणि १५ गंभीर जखमी आहेत . प्लांट च्या कोक ओवन च्या आसपास जवळपास २५ कर्मचारी काम करीत होते. त्याच वेळेला सकाळी पाईप मध्ये अचानक विस्फोट झाला.
[amazon_link asins=’B07C2XFHPZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2487d618-cbae-11e8-a8d9-01e9470dc7b2′]

घटनेची चौकशी सुरु

या घटनेची माहीती मिळताच तेथील जिल्हाधिकारी उमेश अग्रवाल, आईजी पुलिस जीपी सिंह आणि एसपी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले . अधिकाऱ्यांनी लगेचच जखमी व्यक्तींच्या त्वरित इलाज करण्याचे आदेश दिले . सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या दृष्टीने सावधानता बाळगली नसल्याच्या कारणने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु प्रशासनाने मात्र यावर कोणतेही वक्तव्य केले नाही.

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या