Gas Price Hike | …सबसिडीच्या घरगुती म्हणून गॅस सिलिंडरचे दर हजार रुपयांच्या पुढे जाणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gas Price Hike | देशात महागाई (Inflation) वाढत असल्याने याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यातच आता रशिया – युक्रेन या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा (Russia – Ukraine War) फटका देखील सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. रशिया – युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारात (Global Market) कच्चा तेलाचे दर (Crude Oil Prices) भडकले आहेत. परिणामी येत्या काही दिवसांत पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ (Petroleum Price Hike) अटळ मानली जात आहे. सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरु असून निवडणुकीनंतर सबसिडीच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर (Gas Price Hike) एक हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

जागतिक बाजारातील इंधन दराचा आढावा घेऊन दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडर दरात (Gas Price Hike) बदल केले जातात. त्यानुसार 1 मार्च रोजी गॅस सिलिंडर दरात (Domestic Gas Cylinder) वाढ केली जाण्याचे संकेत आहेत. पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एप्रिल 2022 पासून स्वयंपाक बनवणे आणखी महाग होण्याची शक्यता आहे.

 

गेल्या जानेवारी महिन्यापासून इंधन दरात वाढ सुरु आहे.
परंतु तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर (Petrol – Diesel Rates) स्थिर ठेवलेले आहेत.
रशिया – युक्रेन युद्धानंतर जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे (Brent Crude Oil) प्रतिबॅरलचे दर शंभर डॉलर्सच्यावर पोहचले आहेत.
येत्या महिनाभरात हे दर 115 डॉलर्सवर जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) पेट्रोल, डिझेल आणि सबसिडीचा (Subsidy) व गैरसबसिडीचा गॅस, एनएलजी (NLG), सीएनजी (CNG) वायू यांची मोठी दरवाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मागीलवर्षी 6 ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडर दरात वाढ करण्यात आली नाही.
यापार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर म्हणजे 7 मार्चनंतर कधीही गॅस सिलिंडरचे दर 100 ते 200 रुपयांनी वाढवले जाऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मध्यंतरी व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात वाढ झाली होती.
ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत हे दर 170 रुपयांनी वाढवण्यात आले होते.
सबसिडीच्या गॅस सिलिंडर दराचा विचार केला तर दिल्ली – मुंबईत हे दर 900 रुपये आहेत.
7 मार्चनंतर हेच दर हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Gas Price Hike | price of a gas cylinder will incresed in view of russia ukraine war

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा