‘कोरोना’मुळे जगात 3.7 कोटी लोक झाले आणखी गरीब : रिपोर्ट

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 16 : कोरोनामुळे अनेक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय बंद पडले आहेत. तसेच काही मंदावले आहेत. याचा फटका मनुष्यालाही बसलाय. कोरोनामुळे जगभरातील 3.7 कोटी लोक जास्त गरीब झालेत. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने त्याच्या रिपोर्टमध्ये ही बाब स्पष्ट केलीय. करोनाचा संसर्ग झाला असेल पण, यामुळे आर्थिक पातळीवर प्रत्येक देशात अधिक प्रमाणात संकट निर्माण केले आहे, असेही या फाऊंडेशनने म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका अंदाजाचा हवाला देत या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी 18 हजार अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले. त्यानंतरही 2021च्या अखेरपर्यंत जागतिक अर्थव्यवस्था 12 हजार अब्ज डॉलरपेक्षा पुढे जाणार नाही.

फाऊंडेशनच्या गोलकीपर्स रिपोर्टमध्ये जगातील गरीबी कमी करण्यासाठी आरोग्य संदर्भातील मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. करोनाच्या काळात भारतात 20 कोटी महिलांना रोख रक्कम दिलीय. यामुळे भूख आणि गरीबीवर काही प्रमाणात मात करता आलीय. तसेच महिला सबलीकरणाला प्रोत्साहन मिळाले आहे, असेही यात म्हंटलं आहे.

बिल गेट्स यांनी भारतातील आधार कार्डवरील पैसे वर्ग करण्याच्या यंत्रणेचे कौतुक केलंय. ही प्रक्रिया सर्वात उत्तम असून भारताने ज्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी केलीय ती अन्य कोणत्याही देशाने केलेली नाही.