Gauhar Khan Sunglasses Theft From Flight | अभिनेत्री गौहर खानच्या मौल्यवान वस्तूची विमानामधून चोरी; सोशल मीडियावर केलं विमान कंपनीला टॅग

पोलीसनामा ऑनलाइन – Gauhar Khan Sunglasses Theft From Flight | बॉलीवुड अभिनेत्री गौहर खान ही सध्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर नेहमी एक्टिव्ह असणारी गौहर ही आपल्या लाईफ अपडेट शेअर करत असते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पण गौहर ही सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. यामध्ये तिने तिच्या मौल्यवान वस्तूची चोरी झाल्याचे शेअर केले आहे. तसेच एअरलाईनवर चोराचा शोध घ्यावा असे आवाहन अभिनेत्री गौहर खान हिने केले आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Gauhar Khan Sunglasses Theft From Flight)

गौहर खानने तिच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर पोस्ट शेअर करत फ्लाइटमध्ये तिचे सनग्लासेस चोरीला गेले असल्याचे सांगितले आहे. विमान कंपनीने या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंतीही तिने केली. एअरलाइन्सला टॅग करत गौहर ट्वीटमध्ये म्हणाली, “काल तुमच्या दुबई ते मुंबई या फ्लाइट ek508 मध्ये माझे सनग्लासेस चोरीले गेले. मी उतरले तेव्हा ते फ्लाइटमध्येच राहिले होते आणि मी त्याबाबत ताबडतोब इंडियन ग्राउंड स्टाफला माहिती दिली.” (Gauhar Khan Sunglasses Theft From Flight)

पुढे अभिनेत्री गौहर खानने लिहिले की, “कर्मचाऱ्यांनी मला सांगितले की त्यांना माझ्या सीटच्या पॉकेटमध्ये सनग्लासेसची एक जोडी सापडली. पण त्यांनी मला आणून दिलेल्या पॅकेटमध्ये दुसरेच सनग्लासेस होते, जे माझे नव्हते.
मी तुमच्या हेल्प लाइन नंबरवर अनेक वेळा कॉल केला आणि पुराव्यासह ईमेल पाठवला, पण प्रतिसाद मिळाला नाही.
कृपया चोर शोधा कारण तुमच्या नामांकित एअरलाइनमध्ये कॅमेरे बसवलेले आहेत.
तसेच तुमची एअरलाइन्स या सेवेसाठी मोठी रक्कम आकारते.” अशा शब्दांमध्ये अभिनेत्री गौहर खानने विमान
कंपनीला तिचे सनग्लासेस चोरणाऱ्या व्यक्तीला शोधा असे सांगितले आहे.
सोशल मीडियावर गौहरची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री गौहर खान ही तिच्या सध्या एअरलाईनमधून सनग्लासेस चोरीला गेल्यामुळे चर्चेत आली आहे.
यापूर्वी गौहरला तिच्या वजन कमी करण्यावरुन देखील सोशल मीडियावर तुफान ट्रोल करण्यात आले होते.
सध्या गौहर खान ही तिचे आईपण एन्जॉय करत असून तिने काही दिवसांपूर्वी गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weather Forecast Maharashtra | राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट