Gauhati High Court | उच्च न्यायालयाचा निर्णय ! ‘मुस्लिम व्यक्तीनं हिंदू स्त्रीसोबत केलेला दुसरा विवाह अवैध’

गुवाहाटी : वृत्तसंस्था – गुवाहाटी उच्च न्यायालयाने (Gauhati High Court) एका प्रकरणावर निकाल देताना महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. एखाद्या मुस्लीम व्यक्तीने एखाद्या स्त्री सोबत दुसरा विवाह केला तर तो कायदेशीररित्या अवैध असल्याचा निर्णय गुवाहाटी उच्च न्यायालयाने (Gauhati High Court) दिला आहे. द स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट 1954 (The Special Marriage Act 1954) नुसार अशा प्रकारच्या विवाहाला कायदा मान्यता देत नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे.

काय आहे प्रकरण ?
आसाममधील (Assam) सहाबुद्दीन अहमद हे कामरूप जिल्ह्यातील (Kamrup district) अहमदनगर कार्यालयामध्ये नोकरीला होते. 2017 मध्ये एका अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची दुसरी पत्नी दपमणी कालिका (Dapmani Kalika) यांनी आपल्याला पेंशन आणि इतर सरकारी लाभ मिळावेत यासाठी एक याचिका दाखल केली होती. कालिका यांना 12 वर्षाचा एक मुलगा आहे.

या याचिकेवर सुनावणी करताना गुवाहाटी उच्च न्यालयाने सांगितले की, याचिकार्त्या कालिका आणि मृत सहाबुद्दीन यांच्यात झालेल्या विवाहाची नोंद स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टनुसार करण्यात आली होती यामध्ये काही शंका नाही. त्यावेळी त्यांचे पती जिवंत होते. परंतु सहाबुद्दीन यांचा त्यांच्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर दुसरा विवाह झाल्याचा कोणताही पुरावा याचिकाकर्त्यांकडे नाही.

गुवाहाटी उच्च न्यायालयाने निकाल देताना मोहम्मद सलीम अली (मृत) विरुद्ध शमसुद्दीन (मृत) या खटल्याचा संदर्भ दिला.
मुस्लीम कायद्याप्रमाणे (Muslim law) मूर्ती पूजा करणाऱ्या व्यक्तीसोबत जर मुस्लीम व्यक्तीचा विवाह झाला
तर तो विवाह अमान्य असल्याचं या खटल्यामध्ये सांगण्यात आले होते.
याच खटल्याचा संदर्भ या खटल्यामध्ये देण्यात आला.

तसेच इस्लाम (Islam) धर्माच्या नियमानुसार, लग्न करणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी इस्लामला मानले पाहिजे,
असेही सांगितले आहे. या सर्वांचा संदर्भ देत गुवाहाटी उच्च न्यायालयाने एखाद्या मुस्लिम व्यक्तीने हिंदू स्त्री (Hindu woman) सोबत दुसरा विवाह (Second marriage) केल्यास तो कायदेशिररित्या अवैध असल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला.

Web Titel :- Gauhati High Court | muslim man s second marriage with hindu woman void says gauhati high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Whatsapp | ‘व्हॉट्सअ‍ॅप’ स्लो होतय का? मग करा लवकर ‘क्लीन’; जाणून घ्या सोपी प्रोसेस

Politics In Cricket | टीम इंडियामध्ये ‘एन्ट्री’ केल्यानंतर ‘राजकारणा’मुळे बिघडले ‘या’ 11 भारतीय खेळाडूंचे करियर, जाणून घ्या

Jalna Crime | धक्कादायक ! जावयानं सासर्‍याला नदीपात्रात नेलं, दोघांच्या मदतीनं सपवलं; प्रचंड खळबळ