Gaurav More At London | अभिनेता गौरव मोरेचा हास्यजत्रेतून ब्रेक, सोशल मीडियावर पोस्ट करत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gaurav More At London | छोट्या पडद्यावरील सुपरहिट कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) कार्यक्रमातील अभिनेता गौरव मोरे (Actor Gaurav More) हा त्याच्या विनोदीशैलीमुळे घराघरात पोहचला आहे. त्याचा उत्तम अभिनय व सादरीकरणाची कला यामुळे तो महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून पदार्पण केलेल्या गौरवने प्रक्षेकांच्या मनावर आपली वेगळी छाप सोडली आहे. (Gaurav More At London)

Advt.

अभिनेता गौरव मोरे सिनेसृष्टीप्रमाणे सोशल मीडियावरही (Social Media) तितकाच अॅक्टीव्ह असतो. त्याने नुकतच आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा यातील फिल्टर पाड्याचा बच्चन फेम गौरव मोरे हा सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्थ आहे. गौरवनं त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत याबाबत माहिती दिली. मुंबई विमानतळावरील (Mumbai Airport) फोटो गौरवने शेअर केला आहे. या फोटोखाली त्याने ‘लंडन कॉलिंग’ असं कॅप्शन दिले आहे. गौरव नक्की लंडनला कशासाठी गेला आहे याचा त्याने खुलासा केलेला नाही. मात्र या लंडनवारी बद्दलचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत आहे. (Gaurav More At London)

या आधी त्याने भरत जाधव (Bharat Jadhav) सोबत चित्रीकरणाकरिता लंडनवारी केली होती.
तो गौरवचा पहिलाच परदेश दौरा होता. त्यावेळी गौरव म्हणाला होता की, परदेशवारी करणारा घरातला
आणि ज्या चाळीत रहातो तिथला मी पहिला व्यक्ती आहे.
त्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचा देखील दुबई दौरा झाला. तेव्हा देखील गौरव दुबईला (Dubai) गेला होता.
दुबईला गेल्यावर त्याचे अनेक चाहते त्याला भेटायला आले होते.

आता मात्र तो का लंडनला गेला आहे असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
तो कोणता नवीन प्रोजेक्ट करतोय का याकडे देखील त्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title : Gaurav More At London | Actor Gaurav More’s break from the comedy fair, posting on social media…

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘मविआची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत’, भाजप आमदाराची जहरी टीका (व्हिडिओ)

Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | दुर्देवी ! मुलाच्या लग्नासाठी हक्क रजेवर असताना सहाय्यक पोलिस निरीक्षकास हार्टअटॅकने मृत्यू

Maharashtra Politics News | बच्चू कडूंच्या दाव्यामुळं भाजप, शिवसेना अडचणीत, राणांचं टेन्शन वाढलं