मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजेरकर हिनं काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड स्टार सलमान खानच्या दबंग 3 सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर आता महेश मांजेरकर यांची दुसरी मुलगीदेखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सईनंतर आता गौरी इंगवलेसुद्धा अॅक्टींमध्ये डेब्यू करत आहे. मांजरेकरांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या दोन्ही मुली आता अभिनयाच्या मैदानात उतरल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार महेश मांजरेकर आगामी पांघरूण या सिनेमातून गौरी इंगवलेला लाँच करणार आहेत. यात तिची मध्यवर्ती भूमिका असणार आहे. सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सिनेमाची कथा एका विधवेच्या आयुष्याभोवती फिरताना दिसते. आतापर्यंत अनेक सिनेमात बाल कलाकार म्हणून काम केलेल्या गौरीच्या करिअरला खऱ्या अर्थानं आता सुरुवात होणार आहे.
गौरीबद्दल आणखी सांगायचं झालं तर सोशलवर अॅक्टीव असणारी गौरी अनेक ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. पदार्पणाआधीच तिच्या फोटोंची सोशलवर चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे. गौरीचे काही ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. गौरीनं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत जे चाहत्यांच्या नजरेतून सुटले नाहीत असं दिसतंय.
- फेसबुक पेज लाईक करा –
- वाढत्या वयात महिलांना होतात ‘या’ 6 समस्या ; असा करा बचाव !
- ‘ब्रेन स्ट्रोक’ टाळण्यासाठी करा ‘हे’ 7 उपाय, जाणून घ्या 12 लक्षणे
- ‘बॉडी डिटॉक्स’ म्हणजे काय ? बिघडले तर ‘हे’ 5 परिणाम होतात शरीरावर
- काय आहे ‘हर्निया’ आजार ? या 8 पद्धतीने घ्या काळजी
- भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘हे’ 5 पदार्थ ठरतील फायदेशीर !
- ALERT थंडीत वाढते वजन ! ‘या’ 6 उपायांनी ठेवा नियंत्रणात, ‘ही’ आहेत 5 कारणे