‘कोरोना’च्या लढ्यात ‘किंग’ खानची पत्नी पुढे, 95 हजार गरजूंना दिले जेवण

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनावर मात करण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तींसोबतच व्यावसायिक आणि कलाकारही पुढे सरसावले आहेत. अभिनेता शाहरुख खानने महाराष्ट्र सरकारला 25 हजार पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) कीट पुरविले होते. त्यानंतर आता शाहरुखच्या पत्नीने गौरी खाननेदेखील मुंबईतील तब्बल 95 हजार गरजूंच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.

लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आलामुळे  मजूर आणि हातावर पोट असणार्‍यांना दररोज अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक सुविधांशिवाय इतर सर्व काही बंद असल्यामुळे या लोकांच्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे या नागरिकांचे आर्थिक संकटासोबतच दोन वेळच्या जेवणाचेही हाल होत आहेत. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे गरजूंमध्ये शिधावाटप किंवा दोन वेळचे जेवण दिले आहे. त्यानंतर गौरी खान या नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. तिने तब्बल 95 हजार गरजूंच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.

मुंबईतील अनेक भागांमध्ये ती मीर फाउंडेशनच्या सहकार्यातून जेवण पूरवत आहे. रोटी बँक फाउंडेशन आणि मीर फाउंडेशन यांच्या सहयोगाने मुंबईतील 95 हजार गरजू नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. ही तर खरी सुरुवात आहे. अजून अशी बरीच काम करायची आहेत, असे गौरीने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. गौरी खानप्रमाणेच कलाविश्वातील अनेकांना गरजूंना जेवण पुरवले आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान यांचा समावेश आहे.