Gauri Kulkarni | ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा अपघात; बाईकस्वाराने स्कुटीला दिली धडक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Gauri Kulkarni | छोट्या पडद्यावर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. मालिका सध्या रंजक वळण घेताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार आहेत. त्यातच मालिकेतील यश आणि गौरीची जोडी तर सर्वांनाच फार आवडते. या मालिकेत गौरी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णीचा (Gauri Kulkarni) काही दिवसांपूर्वीच अपघात (Accident) झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाले असून तिच्या स्कुटीचे देखील बरेच नुकसान झाले आहे.

 

आई कुठे काय करते या मालिकेतून गौरी आज घरा घराघरात पोहोचली आहे. गौरीने तिच्या अभिनयाने आज प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपासून गौरी मालिकेत दिसत नसल्यामुळे चाहते तिची काळजी करत होते. आता अशातच तिचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. गौरी ज्या मार्गाने जात होती त्याच मार्गावर उलट दिशेने एक बाईकस्वराने वेगाने येत तिला धडक दिल्याने तिची स्कुटी रस्त्यावरच स्लिप झाली. या अपघातात गौरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या व्यतिरिक्त आणखीन तिला छोट्या दुखापतही झाल्या आहेत. या अपघातानंतर डॉक्टरांनी गौरीला तीन आठवड्यांची सक्त आराम सांगितला आहे. या अपघातात तिच्या स्कुटीचे देखील मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

 

आई कुठे काय करते या मालिकेत यश आणि गौरीची (Gauri Kulkarni) जोडी लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते.
आता गौरीच्या अपघाताची बातमी समोर येताच गौरीच्या चाहत्यांना तिची काळजी वाटतं आहे.
गौरी लवकरच बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना देखील करत आहेत. या अपघात नंतर गौरीने सध्या मालिकेच्या शूटिंग मधून ब्रेक घेतला आहे.

 

Web Title :- Gauri Kulkarni | aai kuthe kay karte fame gauri kulkarni had severe accident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepak Kesarkar | राष्ट्रवादी-काँग्रेससोबतची आघाडी तोडा, आजही तुमचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार – दीपक केसरकर

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला

Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले